Type Here to Get Search Results !

थेरोंडा ते श्री क्षेत्र एकविरा : जय मल्हार मित्र मंडळाचा 11 वां पालखी सोहळा भक्तिभावात संपन्न

* चार दिवसांची पदयात्रा ; ‘जय एकविरा माता’च्या जयघोषात परिसर भक्तिमय

अलिबाग / प्रतिनिधी :- थेरोंडा (ता. अलिबाग) येथील जय मल्हार मित्र मंडळ थेरोंडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 11 व्या पदयात्री पालखी सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून भक्ती, समर्पण आणि परंपरेचा वारसा जपत या धार्मिक सोहळ्याची दिमाखात सुरुवात झाली आहे. बुधवार, 10 डिसेंबर ते रविवार, 14 डिसेंबर 2025 या कालावधीत थेरोंडा ते श्री क्षेत्र एकविरा ही भक्तिमय पदयात्रा पार पडत आहे.

थेरोंडा खंडेराव पाडा येथील एकविरा मंदिरात मंगलमय वातावरणात महाआरती करून पालखीचे धार्मिक विधींनी सुसज्ज असे भव्य प्रस्थान करण्यात आले. यावेळी बेंजोच्या सुरात घुमणाऱ्या “जय एकविरा माता” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पदयात्रींच्या ओघात, शिस्तबद्ध मिरवणुकीत आणि भक्तांच्या उत्साहात सोहळ्याचा प्रत्येक टप्पा श्रद्धामय वातावरणात पार पडत आहे.


* सुयोग्य नियोजनामुळे सोहळा शिस्तबद्ध :- या पालखी सोहळ्याचे अचूक व सुयोग्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष सुरेल कोंडे, उपाध्यक्ष शरद नवगावकर, खजिनदार अतिल कोंडे, सेक्रेटरी रविंद्र चौलकर (बबल्या) तसेच गुरव निरंजन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. पदयात्रींसाठी भोजन, निवास, आरोग्य व सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आली असून भक्तांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.


या मंगल आणि पवित्र सोहळ्याची शान वाढविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शाखाप्रमुख अशोक (अण्णा) नाईक, शिवसैनिक जनार्दन कोंडे, ज्ञानेश्वर टिवळेकर, विजय चौलकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले.


* परंपरा व संस्कृतीचे दर्शन :- परंपरा, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा जोपासणारा हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत असून हजारो भाविकांच्या सहभागामुळे संपूर्ण पदयात्रा मार्ग भक्तिरसाने ओथंबून वाहत आहे. चार दिवसांची ही पायी पालखी यात्रा श्री क्षेत्र एकविरा येथे वैभवशाली धार्मिक कार्यक्रमांनी आणि उत्सवाने पूर्णत्वास जाणार आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement