Type Here to Get Search Results !

अधिवेशनात काळेवाडीतील नियमबाह्य विक्रांत वाईन शॉपवर कारवाईची मागणी

* आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला ठोस मुद्दा

* महिला वर्ग व स्थानिक नागरिकांच्या भावना व्यक्त

* मुद्दा उपस्थित केल्याबद्दल दाखले यांनी मानले आभार

पिंपरी / प्रतिनिधी :- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील सह्याद्री सोसायटीमध्ये नियमबाह्यरित्या सुरू असलेल्या ‘विक्रांत वाईन शॉप’वर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी मजबुतीने मांडली. शहरातील महिलांच्या, नागरिकांच्या सुरक्षा व सामाजिक वातावरणाशी निगडित या गंभीर विषयावर सभागृहात लक्ष वेधल्याबद्दल शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे आमदारांचे आभार मानले आहेत.


* अधिवेशनात आमदार जगताप यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे :-

- कम्प्लिशन सर्टिफिकेट (OC) नसताना सह्याद्री सोसायटीच्या इमारतीत विक्रांत वाईन शॉप सुरू आहे, जे पूर्णतः बेकायदेशीर आहे.

- अपूर्ण व अपुर्‍या कागदपत्रांच्या आधारे परवाना मंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत असून, संबंधित निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

- अपूर्ण कागदपत्रांवर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का ? असा थेट सवाल.

- महापालिका प्रशासनाने OC शिवाय दुकान सुरू करण्यास कशी परवानगी दिली? यावर कारवाईची मागणी.

- 4 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीत FL–2 परवाना रद्द करण्याबाबत काय निर्णय झाला? याची स्पष्टीकरणासहित मागणी.

सभागृहात या मुद्द्यांची दृढ मांडणी करून नागरिकांच्या भावना व विशेषतः माता-भगिनींची सुरक्षा यावर भर देत आमदार जगताप यांनी हा विषय राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिला.


* युवराज दाखले यांनी मानले आभार :- शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माता-भगिनींच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणारा हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून आमदारांनी शहरातील नागरिकांच्या भावनांना न्याय दिला. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच परिसरातील महिलांनीही या मागणीला मोठा पाठिंबा दर्शवला असून, नियमबाह्यरित्या चालणाऱ्या अशा विक्री केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement