Type Here to Get Search Results !

तेली सेवा समाज, लोअर परेल तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार

* सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल धनंजय विनायक कुवेसकर यांचा विशेष सन्मान

खालापूर / प्रतिनिधी :- तेली सेवा समाज, लोअर परेल या संस्थेच्या वतीने रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी क्षत्रिय समाज भावसार सभागृह, परमार गुरुजी मार्ग, परेल येथे सायंकाळी 6 वाजता भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थी, पदवीधर, कलाकार, सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ ज्ञाती बांधवांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉं. निलेश पाठक, सवित किशोर नांदलस्कर, अशोक सी. पावसकर, अरुण शिवाजी गोंगाडे, अद्वैत किशोर नादावडेकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष जनार्दन गवाणकर, पदाधिकारी, संचालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या सत्कार सोहळ्यात बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक, तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये अध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार व समन्वयक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे धनंजय विनायक कुवेसकर यांना त्यांच्या सहकार क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.


यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात समाजातील युवकांनी शिक्षण, सहकार, कला व सामाजिक क्षेत्रात पुढे येत जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. अशा प्रकारचे सन्मान समारंभ समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, असेही त्यांनी नमूद केले.


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तेली सेवा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. हा सत्कार सोहळा सामाजिक बांधिलकी, प्रेरणा आणि एकजूट दर्शविणारा उपक्रम ठरला, अशी भावना उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement