* खोपोली एक्झिटजवळ ट्रेलरची कारला जोरदार धडक - एक ठार, दोघे गंभीर जखमी
खोपोली / दिनकर भुजबळ :- मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिटजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात खोपोली येथील 37 वर्षीय मनीष पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून कारमधील दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
* कसा झाला अपघात ? :- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेलर (MH 40 BF 7635) हा कंटेनर घेऊन मुंबईहून पुण्याकडे जात होता. खोपोली एक्झिटजवळ उताराच्या भागात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बेकाबू झालेल्या ट्रेलरने पुढे जात असलेल्या हुंडाई कारला (MH 12 SQ 2695) जोरदार धडक दिली. भीषण धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मनीष पवार यांच्यावर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की मनीष पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
* दोन प्रवासी गंभीर जखमी :- कारमधील दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
* पोलिसांचा तपास सुरू :- खोपोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. ट्रेलर चालकाच्या निष्काळजी वाहनचालकतेचा कोन तपासात अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. एक्सप्रेसवेवरील हा अपघात पुन्हा एकदा ट्रक-ट्रेलरच्या वेग आणि निष्काळजी वाहनचालकतेकडे लक्ष वेधत आहे.


Social Plugin