* गुरुनाथ साठेलकर यांच्या शब्दांतून उलगडलेली एका सामर्थ्यशाली पुत्रीची कथा
“पुत्र व्हावा असा बंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा…” या पारंपरिक उक्तीला खरा छेद देणारी, सामर्थ्य, कर्तव्य, धैर्य आणि जबाबदारीची साक्षात मूर्ती म्हणजे - भक्ती गुरुनाथ साठेलकर.
तुकाराम महाराज म्हणतात, “मऊ मेणाहूनी विष्णुदास, आम्ही वज्राहून कठोर…” भक्ती या ओळींचे जिवंत मिश्रण आहे...मन मऊ, संवेदनशील, प्रेमळ…आणि कृतीत कठोर, अढळ, निश्चयी.
* सामाजिक कार्य तिचा श्वास :- भक्तीसाठी सामाजिक कार्य हे काम नाही…ते तिचे अस्तित्व आहे, तिची ओळख आहे. पाण्याच्या खोल गर्तेत ती निःसंकोच उतरते, उंच डोंगर चढतांना थकवा तिच्याजवळही थांबत नाही, दरीत उतरतांना तोल ढळत नाही, अंधारात पाऊल टाकताना कधीच भिती जाणवत नाही, साप, प्राणी, पक्षांना हातात घेताना तिचे हात थरथरत नाहीत… कारण तिच्यात आहे साहस, प्रसंगावधान, समयसूचकता आणि जबाबदारीची खोल जाण.
* प्रत्येक कामात नियोजन, विचार आणि अचूकता :- भक्तीचे काम करण्याचे तंत्र विशिष्ट आहे. विषय कितीही कठीण असो, परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असो… तिचे निर्णय नेहमी नियोजनबद्ध, क्रमबद्ध, विचारपूर्वक आणि परिणामकारक असतात. एका वेगळ्या दृष्टिकोनातून, योग्य दिशेने आणि लोकहिताचा विचार करून ती मांडलेला प्रत्येक मुद्दा परिणाम देणारा ठरतो.
* स्वतःची वाट स्वतः कोरणारी युवती :- भक्तीने स्त्रीत्वाला कधीच बंधन बनू दिले नाही. शक्ती, संवेदना, बुद्धीमत्ता आणि धैर्य - या चौघांचा अद्भुत संगम तिच्यात आहे. ती आजच्या पिढीतील युवतींसाठी एक जिवंत प्रेरणा बनली आहे.
* पूजा आणि भक्ती - माझा वसा पुढे नेणाऱ्या सामर्थ्यवान पिढ्यांचा जन्म :- गुरुनाथ साठेलकर म्हणतात की, चार दशकांच्या समाजसेवेनंतर मागे वळून पाहतांना माझा वसा पूजा आणि भक्ती या दोन्ही मुलींनी पुढे नेला आहे. समाजकारणाच्या पायावर उभी राहणारी ही नव्या विचारांची पिढी पाहून मन समाधानाने भरून येते. अनुभवांचा आदर, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची शैली या गुणांनी भक्तीची वाटचाल स्थिर, प्रगल्भ, आणि सर्वसमावेशक बनते.
* निर्णयक्षमता, परिणामांची जाणीव आणि स्पष्ट दृष्टी :- भक्तीकडे आहे परिस्थितीची अचूक समज, निर्णय घेण्याची क्षमता, परिणामांची जाण आणि ध्येय स्पष्ट पाहण्याची ताकद म्हणूनच तिच्या भवितव्यात यश निश्चित आहे, आणि त्याहूनही महत्त्वाचे तिच्या अंतर्मनाला मिळणारे समाधान चिरकाल तिच्यासोबत राहणार आहे.
गुरुनाथ विजया रामचंद्र साठेलकर व HELP Foundation यांनी शुभेच्छा व आशिर्वाद देत सांगितले की, “भक्ती, तुझ्या उज्ज्वल भविष्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तुझी वाटचाल अशीच प्रकाशमान होत राहो…”


Social Plugin