* हिंदू - मुस्लिम ऐक्याचे दर्शन : युवा नेते मुन्ना भांडारकर यांच्या पुढाकारातून आयोजन ; गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नगरदेवळा / प्रतिनिधी :- पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आखतवाडे गावात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत हिंदू - मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. युवा नेते प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर, मुन्ना भाऊ प्रेमी, अनुप कृषी सेवा केंद्र तसेच भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने सोमवार, 16 मार्च (26 रमजान) रोजी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या इफ्तार कार्यक्रमात गावातील विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्मीय नागरिकांनीही एकत्र येत इफ्तार केला, ज्यामुळे बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्त्व सांगत परस्पर आदर, सहिष्णुता आणि एकात्मतेचा संदेश दिला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सण साजरे केल्यास सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होते, असेही मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी युवा नेते प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांच्यासह निजाम दादा, अकबर खान, चांद दादा, युनुस दादा, शौकत खान, फैयाज खान, कुतुबुद्दीन भाई, अलीम पैलवान, जाकीर दादा, अफरोज खान, सरफराज भाई, वसीम भाई, साहिल भाई, रेहान भाई, गुड्डू भाई, शागीर दादा, जमशेद दादा, सादिक शहा, अहमद दादा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच बाप्पू दयाराम परदेशी, पत्रकार दिपक गढरी, जितू राजपूत सर, राहुल रामसिंग राजपूत, प्रकाश नामदेव परदेशी, परमेश्वर कैलास परदेशी, नयन दिलीप पाटील, राजेंद्र गणपत राजपूत, सागर डोंगर राजपूत, मंगल महादू गढरी त्याचप्रमाणे नगरदेवळा येथील माजी उपसरपंच विलास भामरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रज्जाक शेख, आदित्य फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य परदेशी, अदनान रजा, कडू नाना पाटील, भूषण पाटील, दिपक पाटील आदींनीही उपस्थिती दर्शवली.
या इफ्तार कार्यक्रमामुळे गावात सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि परस्पर विश्वास वाढविण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला असून, उपस्थित सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Social Plugin