* समाजासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल
* सन्मानामुळे पुढील सेवाकार्यास नवी प्रेरणा
खोपोली / प्रविण कोल्हे :- समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या खोपोली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा सखाराम जाधव यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल “महाराष्ट्र भूषण सन्मान” प्रदान करण्यात आला आहे. समाजातील विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला.
रेखा जाधव या समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवत असून सामाजिक बांधिलकी जपत त्या सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
* सन्मानामुळे वाढली जबाबदारी :- या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करतांना रेखा जाधव यांनी सांगितले की, समाजासाठी केलेल्या छोट्याशा कार्याची दखल घेत मिळालेला “महाराष्ट्र भूषण सन्मान” आयुष्यात कायम स्मरणात राहील. या सन्मानामुळे अभिमान आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली असून पुढे आणखी जोमाने समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
* समाजसेवेची प्रेरणा :- “हा सन्मान माझ्या कार्यासाठी नवी ऊर्जा देणारा असून समाजासाठी अधिक समर्पितपणे काम करण्याची प्रेरणा देतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. रेखा जाधव यांच्या या सन्मानाबद्दल खोपोली परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Social Plugin