Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात रमजाननिमित्त भव्य इफ्तार पार्टी

* हिंदू - मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन ; आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने नगरदेवळा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इफ्तार पार्टीत हिंदू - मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पाचोरा - भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या इफ्तार कार्यक्रमात गावातील विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्त्व अधोरेखित करीत समाजात बंधुभाव, एकता आणि परस्पर आदराची भावना वाढविण्याचा संदेश दिला.


या प्रसंगी मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन इफ्तार केला. त्यामुळे नगरदेवळा परिसरात सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी सर्वांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत शांतता, सौहार्द आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.


या कार्यक्रमाला शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जेष्ठ नेते शिवनारायण जाधव, सुधाकर महाजन, अविनाश कुडे, अब्दुल गनी शेख कमरुद्दीन, नूर बेग मेंबर, सादिक बागवान, आसिफ रजा खान, शेख अन्सार शेख अमिर, नामदेव महाजन, सागर पाटील, रोशन जाधव, प्रकाश परदेशी, गणेश देशमुख, धनराज चौधरी, भैया महाजन, विकी जाधव, सागर जाधव, कन्हैया सिंग परदेशी, सोनू परदेशी, विनोद राऊळ, गोरख महाजन, भारत भामरे, भास्कर आबा पाटील, नाना वकील तसेच जामा मस्जिद पंच कमिटीचे सदस्य, अल खिदमत ग्रुप, टिपू सुलतान ग्रुप, पत्रकार बांधव यांच्यासह गावातील हिंदू - मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले. उपस्थित सर्व नागरिकांनी एकत्र येत कार्यक्रम यशस्वी केला. अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजातील ऐक्य आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement