Type Here to Get Search Results !

पत्रकार फिरोज पिंजारी यांना ‘निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026’ जाहीर

* मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वरतर्फे 9 एप्रिल रोजी जिल्हास्तरीय सोहळ्यात सन्मान ; 18 वर्षांच्या धाडसी पत्रकारितेचा गौरव

कोल्हापूर / प्रतिनिधी :- पत्रकारिता क्षेत्रात निर्भीडपणे आणि सत्यनिष्ठेने कार्य करीत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे युवा पत्रकार फिरोज पिंजारी यांना “निर्भीड पत्रकारिता गौरव पुरस्कार 2026” जाहीर करण्यात आला आहे. मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान 9 एप्रिल 2026 रोजी कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने हा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून समाजकार्य, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

* 18 वर्षांची समृद्ध पत्रकारितेची कारकीर्द :- पत्रकार फिरोज पिंजारी हे सध्या दै. कोकण प्रदेश न्यूज व दै. कोकण प्रजा तसेच कोकण प्रदेश न्यूज पोर्टल आणि केपी न्यूज पोर्टल यांचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) चे संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय ते डिके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टिस (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना) चे महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक तसेच पोलिस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) चे प्रदेश महासचिव म्हणून कार्यरत आहेत.


तसेच देशवाणी मीडिया ग्रुपचे सीईओ व संपादक म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी स्वदेश न्यूज (सॅटेलाइट न्यूज चॅनल) मध्ये महाराष्ट्र राज्याचे सिनिअर रिपोर्टर म्हणून काम केले असून व्हॉईस ऑफ मीडिया आणि अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.


फिरोज पिंजारी यांनी एम.ए. (मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्यांना 18 वर्षांचा समृद्ध पत्रकारितेचा अनुभव आहे. त्यांनी सकाळ, देशोन्नती, जनशक्ती, मातृभूमी, पुण्यनगरी, ANN, लोकशाही, कर्नाळा आदी वृत्तपत्रांमध्ये संपादकीय क्षेत्रात काम केले आहे.


पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. पत्रकारांच्या विविध समस्यांवर त्यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून लिखाण, आंदोलन, उपोषण आणि निवेदनांद्वारे आवाज उठविला आहे. तसेच नवीन पत्रकारांना मार्गदर्शन करणे, पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन अशा उपक्रमांद्वारेही ते पत्रकार बांधवांसाठी कार्यरत आहेत.


* 9 एप्रिलला जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा :- मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्यात फिरोज पिंजारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल असे आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याला नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या पुरस्काराबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून फिरोज पिंजारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement