Type Here to Get Search Results !

“जिचं तिचं आकाश” दूरदर्शनवर

* प्रेरणादायी स्त्रियांच्या कथा आता घराघरात

* “आमची मुंबई” कार्यक्रमातून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा विशेष वृत्तांत ; 25 मार्चला प्रसारण

मुंबई / प्रतिनिधी :- अमेरिका आणि भारतात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा सांगणाऱ्या “जिचं तिचं आकाश” या पुस्तकाच्या शानदार प्रकाशन सोहळ्याचा वृत्तांत आता दूरदर्शनवर झळकणार आहे. हा विशेष कार्यक्रम दूरदर्शनच्या “आमची मुंबई” या लोकप्रिय कार्यक्रमात बुधवार, 25 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित होणार असून गुरुवार, 26 मार्च रोजी दुपारी 2 वाजता त्याचे पुनःप्रसारण करण्यात येणार आहे.

* प्रेरणादायी स्त्रियांच्या यशोगाथा :- चित्रा मेहेंदळे लिखित, ग्रंथाली निर्मित आणि न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित “जिचं तिचं आकाश” या पुस्तकामध्ये विविध क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांच्या यशोगाथांचा समावेश आहे. या कथा समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि महिलांच्या सामर्थ्याचा वेध घेणाऱ्या आहेत.


* कार्यक्रमात मान्यवरांची मनोगते :- या विशेष वृत्तांतामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण दाखविण्यात येणार असून लेखिका चित्रा मेहेंदळे, संपादक देवेंद्र भुजबळ, दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका तसेच कथानायिका दीपाली केळकर आणि प्रकाशिका अलका भुजबळ यांच्या मनोगतांचा समावेश करण्यात आला आहे.


* अनुभवी टीमचे सादरीकरण :- या कार्यक्रमाचे चित्रीकरण सिद्धेश जाधव यांनी केले असून संकलन गौरव जाधव यांनी केले आहे. सूत्रसंचालन तन्वी बर्वे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सहायक निर्माते संजय झनके, निर्माते दीपक शर्मा तर कार्यकारी निर्माते राजेश दळवी आहेत. स्त्रियांच्या जिद्दीच्या आणि यशस्वी वाटचालीच्या कथा जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायी पर्व ठरणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement