Type Here to Get Search Results !

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर नगरदेवळ्यातून जय सप्तशृंगी माता पदयात्रेचे प्रस्थान

* 22 व्या वर्षी परंपरेची अखंड परंपरा

* 26 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान पदयात्रा

* कालिका माता व काळा महादेव मंदिरात आरतीनंतर भाविकांचा उत्साहात गडाकडे प्रस्थान

नगरदेवळा / प्रतिनिधी :- शारदीय चैत्र उत्सवानिमित्त नगरदेवळा येथील जय सप्तशृंगी माता पदयात्रा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या वर्षीच्या 22 व्या पदयात्रेचे रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर गुरुवार, 26 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता उत्साहात प्रस्थान करण्यात आले.

पदयात्रेच्या प्रारंभी नगरदेवळा येथील कालिका माता मंदिर व काळा महादेव मंदिर येथे विधिवत पूजा-अर्चा व आरती करण्यात आली. यावेळी भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर तसेच माजी उपसरपंच विलास भामरे यांनी सपत्नीक आरती करून पदयात्रेचा शुभारंभ केला.


आरतीनंतर “जय माता दी”च्या जयघोषात शेकडो भाविकांनी सप्तशृंगी गडाकडे पायी प्रस्थान केले. भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साह, श्रद्धा आणि भक्तीभाव स्पष्ट दिसत होता. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. ही पदयात्रा 26 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार असून नगरदेवळा (ता. पाचोरा) येथून दरवर्षीप्रमाणे सातत्याने आयोजित केली जाते. “आईच्या गडाला जाऊ या, आईचे दर्शन घेऊ या” हा भाविकांचा श्रद्धाभाव या पदयात्रेतून प्रकर्षाने दिसून आला.


या पदयात्रा प्रस्थान सोहळ्याला राजू पाटील, आबा महाजन, भिका पाटील, नाना भामरे, आप्पा महाराज, सागर पाटील, जितू पाटील, दिपक कोळी, पिरन पाटील, विलास भामरे, कडू नाना पाटील, आदित्य परदेशी यांच्यासह शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement