Type Here to Get Search Results !

इनरव्हील क्लब खोपोलीचा उपक्रम : ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल मोबाईल प्रशिक्षण

* तंत्रज्ञानाशी मैत्री करण्यासाठी मार्गदर्शन, मनोरंजन कार्यक्रमांनी वाढवला उत्साह

* 50 ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग, शिक्षणासोबत आनंदाचा दुहेरी लाभ

खोपोली / सुधीर माने :- इनरव्हील क्लब खोपोलीच्या वतीने नुकतेच ज्येष्ठ नागरिक हॉल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल मोबाईल वापराचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तंत्रज्ञानाची भीती दूर करीत मोबाईल वापराचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दीना शहा, सेक्रेटरी मधुमिता, व्हाईस प्रेसिडेंट राजश्री आणि आयपीपी जयश्री कलोशी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर गणेश पूजन करून कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला. क्लबच्या अध्यक्षा दीना शहा यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रवींद्र घोडके आणि सेक्रेटरी नरेंद्र हर्डीकर यांचे स्वागत करीत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.


व्हाईस प्रेसिडेंट राजश्री यांनी मोबाईलमधील दैनंदिन वापरातील महत्त्वाच्या फिचर्सची माहिती सोप्या पद्धतीने दिली. कॉल, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप, ऑनलाईन व्यवहार यांसारख्या गोष्टींचे प्रात्यक्षिक दाखवून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत शिकण्याचा प्रयत्न केला आणि नवीन तंत्रज्ञानाचा आनंद घेतला.


आयपीपी जयश्री कलोशी यांच्या सुंदर गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर पासिंग रुमाल, हौजी-हौजी आणि विविध सरप्राइज गेम्स घेण्यात आले. या खेळांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली, ज्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.


या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे सुमारे 50 सदस्य आणि इनरव्हील क्लबचे 17 सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी आनंद घेतल्याचे दिसून आले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना क्लबच्या वतीने नाश्ता देण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement