* आधुनिक तंत्रज्ञानासह अत्याधुनिक फिटनेस सेंटर ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल / साबीर शेख :- डेरवली परिसरात आधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ‘पाटील फिटनेस (PF)’ युनिसेक्स जिम या अत्याधुनिक फिटनेस सेंटरच्या नव्या शाखेचे उद्घाटन 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्यदिव्य सोहळ्यात पार पडणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून आमदार महेश बालदी, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, श्रुती डेव्हलपर्सचे लक्ष्मण भाटेशरा तसेच फिटनेस क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ आणि सेलिब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे.
* डेरवलीकरांसाठी अत्याधुनिक फिटनेस सेंटर :- विष्णू वंदन रेसिडेन्सी येथे उभारण्यात आलेले हे फिटनेस सेंटर आधुनिक जिम उपकरणे, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि प्रशस्त, सुरक्षित वातावरण यांसह सुसज्ज असून परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य आणि तंदुरुस्तीचे नवे केंद्र ठरणार आहे.
* पाटील बंधूंची समाजाभिमुख संकल्पना :- 'पाटील फिटनेस सेंटर’ची संकल्पना रमाकांतशेठ पाटील आणि अविनाश पाटील या पाटील बंधूंची असून त्यांनी व्यवसायात नेहमी समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवत विविध उपक्रम राबवले आहेत. गृहनिर्माण क्षेत्रात यश मिळवतांना नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीची गरज लक्षात घेऊन त्यांनी परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक फिटनेस सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे.
* सर्व वयोगटांसाठी सुविधा :- या जिममध्ये युवकांसह सर्व वयोगटातील नागरिकांसाठी व्यायामाची योग्य साधने, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि फिटनेससाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये नियमित व्यायामाची सवय निर्माण होऊन निरोगी आणि तंदुरुस्त समाज घडण्यास मदत होणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्यात आणि नागरिकांनी तंदुरुस्त जीवनशैली स्विकारावी, या उद्देशाने उभारलेले ‘पाटील फिटनेस (PF)’ सेंटर हा परिसरासाठी प्रेरणादायी उपक्रम ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


Social Plugin