Type Here to Get Search Results !

रायगड प्रेस क्लबच्या पुरस्कारांची घोषणा

* 8 एप्रिलला पनवेलमध्ये भव्य सन्मान सोहळा

* 21 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

* राज्यस्तरीय मान्यवर पत्रकारांचा होणार गौरव

पनवेल / प्रतिनिधी :- रायगड प्रेस क्लबच्या वतीने 2026 वर्षातील प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, येत्या 8 एप्रिल 2026 रोजी पनवेल येथे भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रायगड प्रेस क्लबच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे.

* जिल्हा कार्यकारिणी सभेत घोषणा :- ही घोषणा मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणी सभेत करण्यात आली. सभा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, माजी अध्यक्ष विजय मोकल, अनिल भोळे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, सरचिटणीस दर्वेश पालकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, मुख्य संघटक शशिकांत मोरे, महिला संघटिका सीमा मोरे, संघटक दिनेश सुतार, विभागीय सचिव शिवराज पार्टे, जनसंपर्क अधिकारी कमलेश ठाकूर, तसेच पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


* जाहीर झालेले पुरस्कार व मानकरी :- रायगड प्रेस क्लबतर्फे विविध क्षेत्रांतील पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यात आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान - कमलेश सुतार (झी 24 तास), जीवनगौरव सन्मान - उमाजी केळुस्कर (अलिबाग), निशिकांत जोशी स्मृती पत्रकार सन्मान - नरेश पवार (पेण), क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकार सन्मान - तृप्ती पालकर (पनवेल), दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान - स्वप्नील दुधाटे (पनवेल), प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान - रवींद्रनाथ ओव्हाळ (पाली), संतोष पवार स्मृती युवा पत्रकार सन्मान - शिवराज पार्टे (पोलादपूर), ॲंड. जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकार सन्मान - विद्यानंद ओव्हाळ (कर्जत), डॉं. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान - शशिकांत मोरे (रोहा), अँक्टिव्ह जर्नालिस्ट सन्मान - चंद्रहास नगरकर (महाड) व अमूलकुमार जैन (मुरुड), विशेष सन्मान - अजय कदम (माथेरान) व रवींद्र मोरे (खोपोली) तसेच सामाजिक कार्यकर्ता सन्मान - सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (कोलाड) व हेल्प फाउंडेशन (खोपोली), रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता सन्मान - हरेश साठे (पनवेल) व विश्वजीत लुमन (रोहा) यांचा समावेश आहे.


* 8 एप्रिलला भव्य सोहळा :- रायगड प्रेस क्लबचा 21 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा बुधवार, 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संयोजन पनवेल महानगर प्रेस क्लब करणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement