Type Here to Get Search Results !

खोपोलीत 2 एप्रिलला भव्य सामुदायिक विवाह सोहळा

* सहज सेवा फाउंडेशनचा पुढाकार ;  गरजू कुटुंबांसाठी आदर्श उपक्रम

खोपोली / प्रतिनिधी :- आर्थिक अडचणींमुळे लग्नासाठी कर्जबाजारी होणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने 2 एप्रिल 2026 रोजी खोपोली येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “कर्ज काढून लग्न करू नका, सामुदायिक विवाहाचा पर्याय निवडा” असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.

* कर्जमुक्त विवाहाची संकल्पना :- आजच्या काळात मुलामुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर विवाहाच्या वेळी अनेक कुटुंबांना कर्ज काढावे लागते. परिणामी, आयुष्यभर त्या कर्जाचा भार सहन करावा लागतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा हा एक प्रभावी पर्याय ठरत आहे. याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.


* यशस्वी परंपरेचा पुढील टप्पा :- सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी 5 सप्टेंबर 2021, 2 एप्रिल 2022, 2023, 2024 आणि 2025 या वर्षांत मोठ्या उत्साहात सामुदायिक विवाह सोहळे पार पडले आहेत. या यशस्वी परंपरेला पुढे नेत यंदाही हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


या सोहळ्यात सहभागी होणारे सर्व विवाह हे दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरलेले असणार आहेत. तसेच प्रत्येक जोडप्याला अधिकृत रजिस्टर विवाह प्रमाणपत्र दिले जाणार आहे, ही या उपक्रमाची विशेष बाब आहे.


या उपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे, प्रकल्प प्रमुख जयवंत सिद व दिवेश राठोड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य मेहनत घेत आहेत. अधिक माहितीसाठी 9975492470 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement