* राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण-रौप्य पदकांची कमाई
* जितेश साजेकरला सुवर्ण, यश पांगतला रौप्य
* एकलव्य प्रशिक्षण केंद्राची उज्ज्वल कामगिरी
* प्रशिक्षक व शिक्षकांच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश
पेण - सांगली / प्रतिनिधी :- पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट संचालित एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.
शनिवार, 11 व रविवार, 12 एप्रिल 2026 रोजी सांगली येथे आयोजित 15 वी क्लासिक सब-ज्युनिअर, ज्युनिअर व स्पेशल चाइल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत जितेश साजेकर याने 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तर यश पांगत याने 66 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट ताकद, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी साध्य केली.
या यशामागे हनुमान व्यायाम शाळेचे प्रशिक्षक राजेश अनगत सर, तसेच संस्थेचे शिक्षक अमोल काईनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, पालकांचे सहकार्य, तसेच संस्थेतील शिक्षक व मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले.
या यशानंतर विद्यार्थ्यांचे आणि संस्थेचे समाजातील विविध स्तरांवरून अभिनंदन होत असून पेण तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात लौकिक वाढविणारे हे यश ठरत आहे. सुहित जीवन ट्रस्ट परिवारातर्फे या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Post a Comment
0 Comments