* गरीब महिलांसाठी सामाजिक उपक्रम
* रंगकर्मी संतोष सपकाळे यांचा पुढाकार
* वस्त्रदान, स्नेहभोजन व मदतीचा हात
* विविध सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम
नगरदेवळा / प्रतिनिधी :- भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरदेवळा येथील रेल्वे स्टेशन वसाहतीत सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक रंगकर्मी संतोष रामचंद्र सपकाळे यांच्या पुढाकारातून वसाहतीतील गरजू व गरीब महिलांना वस्त्रदान करण्यात आले. यासोबतच स्नेहभोजन व भेटवस्तू देत डॉं. आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
संतोष सपकाळे हे दरवर्षी डॉं. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवितात. गाजावाजा न करता समाजहिताचे कार्य करण्याची त्यांची परंपरा असून यामध्ये पुस्तक वाटप, गरजू नागरिकांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच गरजूंना संकट काळात मदतीचा हात देणे अशा उपक्रमांचा समावेश असतो. या कार्यक्रमावेळी समाधान सपकाळे, सत्यवान मोरे, समाधान पाटील तसेच स्थानिक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments