नगरदेवळा / प्रतिनिधी :- पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नगरदेवळा शहराध्यक्ष पदी साप्ताहीक 'वृत्त प्रभात' व 'एनी टाईम न्यूज' चॅनेलचे पाचोरा प्रतिनिधी जावेद शाह बशीर शाह यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगांव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ पत्रकार बांधवांच्या न्याय हक्क व मागण्यांसाठी सातत्यपूर्ण लढा देत आहे. त्यामुळे जळगांव जिल्ह्यातील खास करून पाचोरा, भडगांव, पारोळा, चाळीसगांव तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दरम्यान, जळगांव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन यांनी जावेद शाह यांची नगरदेवळा शहराध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
या निवडीबद्दल साप्ताहीक वृत्त प्रभातचे मुख्य संपादक फारूक शाह नौमानी, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ भडगाव तालुका अध्यक्ष निलेश महाले, सचिव यश कुमार पाटील, डॉं. बी. बी. भोसले, हर्षल चौधरी, शशिकांत भागवत तायडे, आमीन शाह सत्तार शाह, संभाजी युगराज पाटील, आशुतोष कुमार, भावेश पाटील, दीपक अमृतकार, संजय पांडुरंग कोतकर, भरत शिवाजी चव्हाण, अमिन पिंजारी, गुलाब नेरपगार, सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी हसीबूर शेख, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष तथा दै. कोकण प्रदेश न्यूज (केपी न्यूज) मुख्य संपादक फिरोज पिंजारी, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे, सचिव अनिल पवार, कोकण प्रदेश अध्यक्ष राजेंद्र जाधव, साप्ताहीक वृत्त प्रभातचे अलीम शेख (फैजपूर), नजीर शेख (चिनावल), मनीष परदेशी (सावदा), हाफिज शेख (चोपडा), अझर शेख (चोपडा) आदींनी पत्रकार जावेद शाह यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments