Type Here to Get Search Results !

दिव्यांग बांधवांना दिलासा, पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ

खोपोली / दिनकर भुजबळ :- सामाजिक बांधिलकी आणि समावेशक विकासाच्या दिशेने ठाम पाऊल टाकत खोपोली नगरपरिषदेकडून दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत दिली जाणारी मासिक आर्थिक मदत वाढविण्यात आली असून, यामुळे शहरातील दिव्यांग नागरिकांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. पूर्वी दरमहा 750 रुपये इतकी दिली जाणारी पेन्शन आता वाढवून 1250 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक ताण कमी होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

केंद्र शासनाच्या ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016’ तसेच नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दिव्यांग व्यक्तींसाठी निधी राखून ठेवत विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार खोपोली नगरपरिषदेकडून ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे आणि मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयाचे शहरभर स्वागत होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी नगर परिषद कटिबद्ध असून अशा निर्णयांमधून ‘समावेशक विकासा’ची दिशा अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement