* पत्रकार शाह जावेद बशीर यांचा विशेष सत्कार
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे साप्ताहिक ‘वृत्त प्रभात’च्या वर्धापन दिनानिमित्त आणि रमजान ईदच्या औचित्याने आयोजित ईद मिलन सोहळा अत्यंत उत्साहात व सामाजिक एकोप्याच्या वातावरणात संपन्न झाला. या दुहेरी आनंदसोहळ्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ‘शिरखुर्मा’चा आस्वाद घेतला आणि बंधुभावाचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार एस. के. पवार हायस्कूलचे प्राध्यापक उमेश काटकर सर होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलिस फौजदार निवृत्ती मोरे, हाजी अब्दुल गणी शेठ, अविनाश कुडे, वीरेंद्र भांडारकर, विलास भामरे, अभिलाषा रोकडे, रोशन जाधव, सागर पाटील, मिलिंद दुसाने, आदित्य परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार शाह जावेद बशीर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘वृत्त प्रभात’चे संपादक फारुख शाह नौमानी व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच या सोहळ्यात स्थानिक जेष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, मिलिंद दुसाने, शैलेंद्र बिरारी, अली रजा खान, फारुख शेख, दिपक (सोनू) परदेशी, फिरोज पिंजारी, हशीबुर शेख. भडगाव-कजगाव पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास हिलाल महाजन, नितीन सोनार, मांगीलाल मोरे, निलेश महाले, डॉं. बी. बी. भोसले, यश कुमार, हर्षल चौधरी. साप्ताहीक वृत्त प्रभातचे संपादक फारुख शाह नौमानी, सय्यद कुदबुद्दीन, आमिन शाह, अय्युब शेख, जुबेर मणियार तसेच पोलिस कॉन्स्टेबल मजिद पठान, वैभव पाटील. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नूर चेअरमन, सागर पाटील, बशीर शाह, रोशन जाधव सर, डॉं. युवराज गढरी, सादिक बागवान, आसिफ रजा खान, मेंबर सुनील महाजन, अशोक सान्नी, सोनू नाना, उमर रजा टेलर, इश्तियाक बेग, मोसिन बेग, सद्दाम शाह, राजेंद्र भांडारकर, कोकंदे सर, पी. एम. पाटील सर, रोकडे सर, जाकीर सर, कन्हैयासिंग परदेशी, सुनील शिरोडे, शेर शाह, छोटू लोहार, शकील बागवान, गणेश देशमुख, मुदस्सर शेख, शेर खान, अजय शिरुडे, कडू नाना पाटील, जब्बू शेख, अन्वर शेख आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
* 'वृत्त प्रभात’ विशेषांकाचे प्रकाशन :- वर्धापन दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘वृत्त प्रभात विशेषांकाचे’ प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकात विविध सामाजिक, प्रादेशिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला असून उपस्थितांनी त्याचे स्वागत केले.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘शिरखुर्मा’ पार्टी आणि वृत्तपत्राचा वर्धापन दिन या दोन्हींच्या संगमातून सर्वधर्मीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. कार्यक्रमाने नगरदेवळा शहरातील सामाजिक सलोखा आणि पत्रकारितेची बांधिलकी अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संपादक फारुख शाह नौमानी यांनी केले.


Post a Comment
0 Comments