Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथे वानर देवाचे दुःखद निधन

* ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

* जनार्दन स्वामी कुटीया परिसरातील घटना

* सायंकाळी निधन, रात्री विधिवत अंत्यसंस्कार

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथील राजेंद्र रंगराव महाजन यांच्या सुमनाई निवासस्थानाजवळील जनार्दन स्वामी कुटीया परिसरात वास्तव्य करणाऱ्या वानर देवाचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची घटना 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी एकत्र येत वानर देवांना श्रद्धांजली अर्पण केली. हिंदू धर्मात वानरांना विशेषतः भगवान हनुमानाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे ग्रामस्थांनी या घटनेकडे अत्यंत श्रद्धेने पाहिले. वानर देवांच्या निधनानंतर रात्री 8 वाजता नगरदेवळा गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत गावातील तरुण, जेष्ठ नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वातावरणात श्रद्धा, भावनिकता आणि भक्तिभाव जाणवत होता.


दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा तयार करून वानर देवांचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जय श्रीराम व्यायाम शाळा येथील तरूण व ग्रामस्थांनी उपस्थित राहून अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement