* महिला संघटन बळकटीसाठी महत्त्वाची जबाबदारी
अलिबाग / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲंड. पल्लवी सत्यजित तुळपुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील महिला राजकारणात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अलिबाग येथील रहिवासी असलेल्या ॲंड. तुळपुळे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पक्षाच्या वतीने ॲंड. तुळपुळे यांना महिला मोर्चाचे संघटन अधिक सक्षम करण्यासोबतच तळागाळातील महिलांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांपर्यंत पक्षाच्या योजना आणि विचार पोहोचवणे, तसेच महिलांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांमध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ॲंड. तुळपुळे या पक्षाच्या ध्येय - धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करीत संघटन बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करतील, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ॲंड. पल्लवी तुळपुळे या कायदेविषयक पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्या असून, त्यांच्या अनुभवाचा उपयोग महिला सक्षमीकरणासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण रायगड जिल्ह्यात भाजप महिला मोर्चाला नवी दिशा आणि गती मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.


Post a Comment
0 Comments