Type Here to Get Search Results !

हापूस, केसर, पायरी आणि फणसाची बाजारपेठ गाजविणारे ‘बिलाल फ्रुट अँड कंपनी’ ग्राहकांच्या पसंतीस

* दर्जेदार फळे, योग्य दर आणि विश्वासार्ह सेवेमुळे चिपळूणमध्ये व्यापाऱ्यांची खास ओळख

चिपळूण / प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्यांच्या हंगामाला यंदा मोठी मागणी निर्माण झाली असून चिपळूण शहरातील ‘बिलाल फ्रुट अँड कंपनी’ हे नाव ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. हापूस, केसर, पायरी तसेच दर्जेदार फणस विक्रीत या व्यापाऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सुगंधी हापूस, गोडसर केसर, रसाळ पायरी आणि ताज्या फणसासाठी ग्राहक दूरदूरहून येथे खरेदीसाठी येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उत्तम दर्जा, योग्य भाव आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ‘बिलाल फ्रुट अँड कंपनी’ने अल्पावधीतच बाजारात विश्वास संपादन केला आहे.


यंदा आंब्यांच्या भावात वाढ झाली असतांनाही ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल उपलब्ध करून देण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. फळांची निवड, पॅकिंग आणि ताजेपणा यावर विशेष भर दिला जात असल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


चिपळूणसह परिसरातील व्यापारी बाजारात ‘बिलाल फ्रुट अँड कंपनी’ची चर्चा रंगत असून हापूस, केसर, पायरी आणि फणसाच्या विक्रीत या व्यापाऱ्यांनी आपली खास छाप उमटवली आहे. स्थानिक बाजारपेठेत दर्जेदार फळांसाठी हे नाव ग्राहकांच्या विश्वासाचे केंद्र बनत असल्याचे चित्र आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement