* देशसेवेसाठी सज्ज झालेल्या सात युवकांचा शिवसेनेकडून गौरव
* रावसाहेब पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व हार घालून सन्मान
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- भारतीय सैन्य दलात "अग्निवीर" म्हणून निवड झालेल्या नगरदेवळा येथील सात होतकरू युवकांचा गुरुवार, 4 जून रोजी सायंकाळी 8 वाजता शिवसेना कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. देशसेवेसाठी निवड झालेल्या या युवकांचा गौरव करतांना उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या हस्ते अग्निवीर म्हणून निवड झालेल्या मोहित चौधरी, मयुर पाटील, पलाश पाटील, मोहित मोरे, केतन महाजन, आकाश पाटील आणि कल्पेश शार्दुल यांचा शाल, श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला.
* देशसेवेच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या युवकांचा गौरव :- भारतीय सैन्य दलात निवड होणे हे प्रत्येक युवकासाठी अभिमानाची बाब मानली जाते. कठोर परिश्रम, शिस्त, जिद्द आणि देशसेवेची भावना याच्या बळावर या युवकांनी अग्निवीर भरतीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे नगरदेवळा गावासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देशसेवेसाठी सज्ज झालेल्या या युवकांनी इतर तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
* शिवसैनिक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती :- या सत्कार सोहळ्यास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अविनाश कुडे, गणेश देशमुख, मनोज राऊळ, विनोद राऊळ, रोशन जाधव, सागर पाटील, धनराज चौधरी, रवि पाटील, सागर महाजन, अरविंद परदेशी, विक्की जाधव, अमित टेलर, दिपक पवार सर, उमेश पाटील, भैय्या उत्तम महाजन, बबलु पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
* युवकांसाठी प्रेरणादायी क्षण :- सत्कार सोहळ्यावेळी उपस्थितांनी अग्निवीर म्हणून निवड झालेल्या युवकांचे कौतुक करीत त्यांच्या यशामागील मेहनतीचा गौरव केला. गावातील अधिकाधिक युवकांनी सैन्य, पोलीस आणि अन्य शासकीय सेवांमध्ये प्रवेश करून देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
देशाच्या संरक्षणासाठी आपले योगदान देण्यासाठी सज्ज झालेल्या या सात युवकांचा सत्कार हा नगरदेवळा गावासाठी अभिमानाचा क्षण ठरला.


Social Plugin