नगरदेवळा येथील युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले भाजप नेते तथा अनुप कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर हे कोणतेही अधिकृत पद नसतानाही सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते रज्जाक शेख यांनी व्यक्त केले.
मुन्नाभाऊ भांडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करतांना रज्जाक शेख म्हणाले की, खंडेराव महाराजांची यात्रा गावापासून लांब भरत असल्याने भाविक आणि यात्रेकरूंना खड्डेमय रस्त्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर मुन्नाभाऊंनी कोणताही विलंब न करता तत्काळ मुरूम टाकून जेसीबीने रस्त्यांवरील खड्डे बुजविले. तसेच माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या वीजखांबांवरील बंद पडलेले दिवे त्यांनी स्वतःच्या खर्चातून सुरू करून दिले.
नगरदेवळा-सीम रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडे जेसीबीच्या सहाय्याने हटवून सुमारे चार ते पाच किलोमीटरचा रस्ता मोकळा करून दिला. गावातील विविध समस्या स्वखर्चातून सोडविण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मागील वर्षभरापासून मुन्नाभाऊ भांडारकर सातत्याने लोकांमध्ये राहून काम करीत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही पद नसतानाही ते मनापासून जनसेवा करीत आहेत. काम करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा आणि विकासाची तळमळ पाहता भविष्यात ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांमध्ये जनतेने त्यांना संधी दिल्यास ते परिसराचा सर्वांगीण विकास करून हा भाग सुजलाम-सुफलाम करतील, असा विश्वास आहे.
मुन्नाभाऊ भांडारकर हे युवा पिढीचे नेतृत्व असून आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. त्यांनी सुरू केलेल्या विकासाच्या आणि समाजसेवेच्या कार्याला सर्वांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रज्जाक शेख यांनी करीत मुन्नाभाऊ भांडारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
* शब्दांकन - फिरोज पिंजारी (8454886853)



Social Plugin