* पावसाळ्यात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सफाई
* कर्मचाऱ्यांना मानवंदना, आरोग्य सुरक्षेसाठी पुढाकार
कर्जत / नरेश जाधव :- पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने नेरळ ग्रामपंचायत कार्यालयातील सफाई कामगार बंधू-भगिनींना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे तसेच रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सतीश कालेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, मुसळधार पावसातही सफाई कर्मचारी नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी निस्वार्थपणे कार्य करतात. त्यांच्या या सेवाभावाचा गौरव करण्याबरोबरच पावसाळ्यात त्यांचे आरोग्य सुरक्षित रहावे, या उद्देशाने रेनकोटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बैसाणे, महाराष्ट्र राज्य रोजगार व स्वयंरोजगार सरचिटणीस सिद्धी आंगणे, कर्जत तालुका अध्यक्षा दर्शना कालेकर, नेरळ शहराध्यक्ष हेमंत चव्हाण, उपतालुका संघटक जितेंद्र रुठे, विनोद शेंडे, अमोल कालेकर, किरण राणे, किशोर कालेकर, नारायण कालेकर, शाखाध्यक्ष बिरदोले, नमिता कालेकर, पंकज बुंधाटे, भालचंद्र राणे, चंदू राठोड यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रेनकोट स्विकारल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले. त्यांच्या दैनंदिन कामकाजात अशा उपयुक्त साहित्यामुळे मोठी मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत प्रत्यक्ष गरज ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही स्वागत केले.


Social Plugin