Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यातील वाघनगर परिसरात पावसामुळे साचलेल्या डबक्यात पडून वृद्ध महिला जखमी

* खालची गल्लीतील रस्त्याची दुरवस्था ; ग्रामपंचायतीने तातडीने माती टाकून डबके बुजविण्याची नागरिकांची मागणी

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील वाघनगर परिसरातील खालची गल्ली येथे पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून डबके निर्माण झाले आहे. या डबक्यामुळे मंगळवार, 28 जुलै रोजी सकाळी सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास कमलाबाई गढरी या वृद्ध महिलेचा पाय घसरून त्या पडल्याची घटना घडली.

घटनेनंतर परिसरातील छोटू पिंजारी, ईश्वर चौधरी, सलीम शाह, कन्हैया गुरव, रहीम शेख आणि हमिद पिंजारी यांनी तात्काळ धाव घेत कमलाबाई गढरी यांना मदत केली व सुरक्षितस्थळी हलविले.


परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.


याप्रकरणी युवा नेते छोटू पिंजारी यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत, सदर ठिकाणी तातडीने माती टाकून डबके बुजवावे व नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.


दरम्यान, परिसरातील ग्रामस्थांनीही ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement