* इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत असिया शेख अफरोज हिला 300 पैकी 178 गुण ; नगरदेवळ्याच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा
नगरदेवळा / प्रतिनिधी :- जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील विद्यार्थिनी असिया शेख अफरोज हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 178 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून नगरदेवळा परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
असियाने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळविले. तिच्या यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मोठा वाटा असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
या यशाबद्दल विद्यार्थिनी असिया शेख अफरोज, तिचे वडील शेख अफरोज रहीम, काका शेख जावेद रहीम, वर्गशिक्षिका सना शेख, मुख्याध्यापक तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम मार्गदर्शन करीत असल्याचे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
असियाच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यातही शाळेचे विद्यार्थी विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Social Plugin