Type Here to Get Search Results !

श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कालिदास सोनवणे

* व्हा. चेअरमनपदी ॲंड. मदन मोरे यांची बिनविरोध नियुक्ती

* 25 वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

बाळद - पाचोरा / दिलीप पाटील :- पाचोरा शहरातील देशमुखवाडी परिसरात कार्यरत असलेल्या श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळद येथील कालिदास सोनवणे (सोनार) उर्फ राजू बाळदकर, तर व्हाईस चेअरमनपदी ॲंड. मदन मोरे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.

संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल संचालक मंडळासह सभासद व विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


* सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कारभार :- श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने कोणताही जातीभेद न करता विविध समाजातील नागरिकांना सभासद करून घेतले आहे. तसेच अनेक सभासदांना व्यवसाय व रोजगाराच्या उद्देशाने कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याने संस्थेने पाचोरा शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे सांगण्यात आले.


संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली संस्थेचा कारभार सुरू असून, संस्थेला स्थापन होऊन सुमारे 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. दरवर्षी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी बदलण्याची परंपरा संस्थेत आहे. त्यामुळे संचालक मंडळातील प्रत्येक संचालकाला नेतृत्वाची संधी मिळते.


* शून्य थकबाकी व शून्य NPA असल्याचा दावा :- संस्था आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून अनेक सभासद व ग्राहकांच्या ठेवी संस्थेत असल्याचे सांगण्यात आले. संस्थेच्या वतीने दरवर्षी सभासदांना डिव्हिडंड दिला जात असल्याची माहिती देण्यात आली. तसेच संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत थकबाकीचे प्रमाण शून्य टक्के असून NPA देखील शून्य टक्के असल्याचा दावा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.


* बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम :- श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होत आली असल्याचे सांगण्यात आले. यंदाही ही परंपरा कायम राहिली असून चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड बिनविरोध झाल्याने संस्थेतील संचालक मंडळातील समन्वय अधोरेखित झाला आहे.


* नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन :- कालिदास सोनवणे यांची चेअरमनपदी आणि ॲंड. मदन मोरे यांची व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व संचालक मंडळ, अहिर सुवर्णकार मंडळ, नवयुवक सुवर्णकार मित्र मंडळ, अहिर सुवर्णकार महिला मंडळ तसेच बाळद येथील विविध मित्रमंडळींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.


नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेचा कारभार अधिक गतिमान होऊन सभासदांच्या हितासाठी संस्थेची प्रगती आणखी पुढे जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement