Type Here to Get Search Results !

इकोफ्रेंडली गणपती डेकोरेशन स्पर्धेत संतोष गायकर प्रथम

* रोटरी क्लब खोपोलीच्या सातव्या वर्षातील स्पर्धेला 15 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

* ज्योती शिंदे द्वितीय, दोन स्पर्धकांना संयुक्त तृतीय क्रमांक

खोपोली / प्रतिनिधी :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब खोपोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इकोफ्रेंडली गणपती डेकोरेशन स्पर्धेत वरची खोपोली येथील संतोष गायकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष असून, यावर्षीही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यंदाच्या स्पर्धेसाठी एकूण 15 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. सर्व स्पर्धकांनी पर्यावरणपूरक संकल्पना आणि आकर्षक सजावटीच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. त्यामुळे सर्वच सजावटी सुंदर आणि लक्षवेधी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी रोटरी क्लबच्या वतीने सहा सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने सहभागी स्पर्धकांच्या गणपती सजावटीची पाहणी करून परीक्षण केले. त्यानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली.


स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे :- 

🥇 प्रथम क्रमांक - संतोष गायकर, वरची खोपोली

🥈 द्वितीय क्रमांक  - ज्योती शिंदे, बोनझर

🥉 तृतीय क्रमांक -  संयुक्त & दिक्षा घरत, विहारी & भाविक शेडगे, शास्त्रीनगर

🏅 उत्तेजनार्थ - आनंद शाळा, खोपोलीफाटा विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोटरी क्लबच्या वतीने ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक सजावटीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम यंदाही यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.


गणेशोत्सवातील सजावट करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर वाढावा आणि नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, या उद्देशाने रोटरी क्लब खोपोलीकडून गेल्या सात वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या स्पर्धेत 15 प्रवेशिका आल्याने या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.


स्पर्धेच्या आयोजनासाठी रोटरी क्लब खोपोलीच्या अध्यक्षा कविता खोपकर, सेक्रेटरी रोहित भल्ला, एन्व्हायर्नमेंट अध्यक्ष संतोष चव्हाण, बुलेटिन अध्यक्ष निधी सिंग तसेच आयोजक संजय पाटील आणि सर्वोदय यांनी विशेष मेहनत घेतली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी रोटरी क्लबकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement