Type Here to Get Search Results !

30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी!

* मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द : आंदोलनानंतर शेतकरी संघटनांचे समाधान, सरकारवर वचनपूर्तीची जबाबदारी

मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी निर्णायक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या वचनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकार गंभीर असून या दिशेने योजना अंतिम टप्प्यात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


शेतकऱ्यांना तात्काळ आणि शाश्वत दिलासा देण्यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या (मित्रा) वतीने ही समिती एप्रिल पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करणार असून, त्यातील शिफारसींचा अभ्यास केल्यानंतर कर्जमाफीचा अंतिम निर्णय घोषित केला जाईल.


फडणवीस म्हणाले की, आर्थिक आव्हाने असली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. अतिवृष्टी आणि महापूरग्रस्तांसाठी साडेआठ हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला आहे. त्यापैकी सहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असून उर्वरित निधी 15 दिवसांत वितरित केला जाईल.


या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राजू शेट्टी, बच्चू कडू, डॉं. अजित नवले, रविकांत तुपकर आदी उपस्थित होते.


सरकारने कर्जमाफीबाबत ठोस तारीख जाहीर केली आहे. आम्ही चर्चेबाबत समाधानी आहोत. सरकार शब्द पाळेल याची अपेक्षा आहे.

- बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार संघटना



कर्जमाफीच्या तारखेसाठी दोन तास चर्चा झाली. शेवटी सरकारने 30 जूनपूर्वी कर्जमाफीची हमी दिली आहे.

- डॉं. अजित नवले, अखिल भारतीय किसान सभा


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement