Type Here to Get Search Results !

सुबोध सावंत यांनी समाजसेवेच्या माध्यमातून साजरा केला 43 वा वाढदिवस!

* विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ, म्हाडा वसाहत शिरढोणतर्फे सामाजिक उपक्रमांचा उत्सव

खालापूर / प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील शिरढोण या परिसरात सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच लोकसेवेत आघाडीवर असलेले “विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ (नियोजित)”चे आधारस्तंभ व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पशुप्रेमी सुबोध सावंत यांनी यंदाचा आपला 43 वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून साजरा केला.


25 ऑक्टोबर रोजी म्हाडा वसाहत, शिरढोण येथे सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यात विशेषतः युवा पिढीसाठी क्रिकेटचे संपूर्ण साहित्य वाटप करण्यात आले. क्रीडाप्रेमी तरुणांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. उद्घाटन सोहळा म्हाडा वसाहत येथे उत्साहात पार पडला, ज्यामध्ये नागरिक आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.


सुबोध सावंत यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही भव्य समारंभ न करता सामाजिक कार्य आणि जनसेवेच्या उपक्रमांना प्राधान्य दिले. त्यांनी सांगितले, वाढदिवस साजरा करण्याऐवजी जर आपण कोणाचे हसू वाढवू शकलो, गरजूंची मदत करू शकलो, तर तीच खरी आनंदाची भेट आहे. त्यांच्या या सामाजिक जाणिवेच्या उपक्रमाने परिसरातील तरुणांमध्ये एक प्रेरणादायी संदेश पोहोचला आहे.


विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात युवकांना क्रिकेटचे साहित्य वाटप करण्यात आले. युवा पिढीला खेळातून एकता, शिस्त आणि आरोग्याचा संदेश देणे हा यामागचा उद्देश असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भगवान पोपळे, कार्याध्यक्ष गणेश यावलकर, खजिनदार गणेश महाजन, सचिव गणेश पारेकर, तसेच संतोष किर्ते, बाळू यावलकर, गणेश वटे, दिनेश नागणे, अक्षय चालखोर, संदीप कदम, अमोल कुळवेकर, प्रज्वल पाटील, भितेश पवार, अमोल टोपे, शिवाजी चव्हाण, नाना रोकडे, अजिंक्य टोपे, रोहित कारभारी, कृष्णा फरकटे, दत्ता जामकर, दत्तात्रय बोर्डे, सुशांत दरेकर, सुशांत जाधव, दिनेश पवार, उमेश खराडे, चेतन कदम आदींची उपस्थिती लाभली.


सुबोध सावंत हे केवळ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्तेच नाहीत, तर पशुप्रेमी म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून परिसरात अनेक प्राणी बचाव उपक्रम राबविण्यात येतात. त्यांच्या कार्यशैलीत सद्भाव, सेवा आणि संवेदना यांचा संगम दिसतो.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement