* माजी नगरसेवक ॲंड. संकेत भासे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक 2 मधील संजयनगर, दहिवली प्रभागातील महिलांची कोल्हापूर दर्शन ट्रिप
कर्जत / नरेश जाधव :- विकासाच्या बरोबरीने समाजातील सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणारा उपक्रम माजी नगरसेवक ॲंड. संकेत भासे यांच्या पुढाकारातून साकारला आहे. वॉर्ड क्रमांक 2 मधील संजयनगर, दहिवली प्रभागातील दीडशेहून अधिक महिलांसाठी कोल्हापूर दर्शन ट्रिप आयोजित करण्यात आली. ही यात्रा रविवार, 27 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठ्या उत्साहात रवाना झाली.
या ट्रिपमध्ये वॉर्ड क्रमांक 2 मधील सर्व विभागांतील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देखील या यात्रेत सहभागी होऊन धार्मिक व सांस्कृतिक सौहार्दाचे दर्शन घडवले. संजयनगर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
ट्रिपच्या प्रस्थानावेळी माजी नगरसेवक ॲंड. संकेत भासे यांनी स्वतः उपस्थित राहून नारळ फोडत “प्रवास निर्विघ्न पार पडो” अशी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी सर्व महिलांना व्यक्तिगत भेटून शुभेच्छा दिल्या आणि सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शन केले. या वेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी नगरसेवक ॲंड. संकेत भासे यांच्या कार्यकाळात वॉर्ड क्रमांक 2 मध्ये अनेक विकासकामांची अंमलबजावणी झाली आहे. सांडपाणी व्यवस्था, रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि महिला बचतगटांसाठी प्रोत्साहन अशा विविध योजनांमुळे हा प्रभाग आज एक आदर्श विभाग म्हणून ओळखला जातो. सण, उत्सव आणि सामाजिक उपक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
कर्जत शहरात आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती मिळत आहे, तर त्या धोरणाला पूरक ठरत आहेत ॲंड. संकेत भासे यांच्या उपक्रमशील नेतृत्वाची दिशा. नागरिकांसाठी राबवलेले विविध सामाजिक व नागरी उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक जाणीव यामुळे कर्जत शहराचा कायापालट घडवून आणण्याचे श्रेय त्यांना मिळत आहे. या ट्रिपमुळे महिलांमध्ये एकात्मता, श्रद्धा आणि सहकार्याची भावना अधिक बळकट झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


Social Plugin