Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात 'मिशन ऑलिंपिक'ची तयारी सुरु!

नागपूर / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पुरुष आणि महिलांसाठीच्या '75 व्या सिनिअर स्टेट बास्केटबॉल चॅम्पियनशिप (मुख्यमंत्री चषक)'चे उदघाटन केले. 

नागपूर ही समृद्ध क्रीडा परंपरेसाठी ओळखली जाणारी नगरी आहे. क्रीडाक्षेत्रात गेल्या 50 वर्षांपासून केलेल्या कार्याचा उल्लेख करीत धरमपेठ क्रीडा मंडळाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. 


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळावे याकरीता परदेशी प्रशिक्षक, त्यासोबत फिजियोथेरेपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, मॅनेजर अश्या अनेक गोष्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. चांगल्या खेळाडूला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या उपलब्ध करुन देण्यावर भर असून, महाराष्ट्रात 'मिशन ऑलिंपिक'ची तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच नागपूरमधील मानकापूर स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम असे भव्य क्रीडा संकुलामध्ये परावर्तीत करण्याचे काम देखील सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'खेलो इंडिया'च्या माध्यामातून गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकल्याचा उल्लेख करीत क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन राज्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 


राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पदक मिळवलेल्या महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाडुंचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला. यावेळी आमदार संदीप जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement