Type Here to Get Search Results !

कार्यसम्राट लोकनेता किशोर आप्पा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !



* पाचोरा-भडगाव मतदारसंघाचा अभिमान, विकासाचे ध्येय व जनसेवेची निष्ठा

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे हक्काचे लोकनेते, जनतेच्या प्रेमाने पुन्हा पुन्हा विजयी ठरलेले हॅट्रिक आमदार कार्यसम्राट किशोर आप्पा पाटील यांचा आज वाढदिवस.


खऱ्या अर्थाने जनतेचा नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे किशोर आप्पा पाटील. पाचोरा-भडगाव विधानसभेसाठी अहोरात्र झटणारा नेता म्हणजे आप्पासाहेब म्हणूनच 'लोकनेता' या शब्दाची व्याख्या किशोर आप्पा यांच्या कार्यकर्तृत्वातून कळते. राजकीय प्रवास शिवसेना जिल्हाप्रमुख पदापासून सुरू झाला आणि आज ते मतदारसंघाला उज्ज्वल दिशा देणारे लोकप्रिय आमदार म्हणून किशोर आप्पा नाव नर्मदेसारखे जनमानसात वाहते आहे.


आप्पांच्या कार्याचा झरा केवळ राजकीय मर्यादेत नाही, तर विकास, जनसेवा आणि प्रशासनातील दांडगा अभ्यास यामुळे ते मतदारसंघाच्या प्रत्येक मनात खास स्थान मिळवू शकले आहेत. आप्पासाहेबांचा कामाचा आवाका पाहिला तर नक्कीच भविष्यात आप्पांना ज्याच्या उपेक्षेत मतदारसंघ आहे, त्या मंत्रिपदासाठी काम करण्याची संधी व चुणूक आप्पांकडे आहे. विशाल खान्देशाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानसभेत व कामातून अनेक दिग्गज नेतेमंडळी यांनी केले आणि अभिमानाची गोष्ट अशी की, किशोर आप्पा पाटील देखील त्या पंगतीत आज येऊन बसले आहेत. प्रत्येकाला हेवा वाटावा अशी मतदारसंघाची विकास कामांरुपी बांधणी आप्पासाहेबांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने केली.


* मतदारसंघातील ठोस कामगिरी :-

- पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पांना गती

- शासकीय योजनांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी

- प्रशासनाशी समन्वय साधून त्वरित प्रश्न मार्गी लावण्याची कुवत

- MH 54 परिवहन विभागाची स्थापना


* मतदारसंघासाठी ऐतिहासिक निर्णय :- जे जे नवे ते ते पाचोरा - भडगावला हा आप्पांचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरतांना दिसतो. जनतेचा आवाज बनून, प्रश्नांना सामोरे जात, त्यांचे निराकरण करून दाखविण्याची आप्पांची शैली हे त्यांच्या नेतृत्वाचे सर्वांत मोठे बळ आहे.


* भविष्यातील आशा :-  मतदारसंघाच्या अपेक्षा उंच आहेत. आप्पांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे भविष्यातही मोठ्या जबाबदाऱ्यांची संधी त्यांना मिळेल, अशी सर्वांच्या मनात आशा आहे.


* शुभेच्छांचा संदेश :-

आई नर्मदेच्या कृपेने,

जनतेच्या आशीर्वादाने

आणि विकासाच्या निर्धाराने

आप्पांचा प्रवास असाच तेजोमय होत राहो…


* किशोर आप्पांसाठी काही ओळी :-

जनतेच्या मनात घर करणारे नेते,

विकासाची दिशा देणारे कर्तृत्ववान चेहरे,

पाचोरा - भडगावचा आधार, आमचा अभिमान,

किशोर आप्पा, तुम्हीच आमचे प्रेरणास्थान!


आप्पांची प्रशासनावर असलेली पकड,  शासकीय नियमांचा अभ्यास व मतदारसंघाचा तोंडपाठ असलेला रेखांश - अक्षांश यामुळेच आप्पांचे नेतृत्व अधिक बहरत आहे म्हणूनच अशा बहरत्या नेतृत्वाला जपले पाहिजे. आप्पांना निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी आयुष्य लाभो.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

- सोनू परदेशी (पत्रकार तथा युवासेना पाचोरा विधानसभा अध्यक्ष) 

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement