* मराठी व हिंदी युट्युब न्यूज चैनल, पोर्टल, दैनिक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे ‘देशवाणी’ करणार माहितीविश्वात क्रांती!
* 26 जानेवारी 2026 पर्यंत सुरू होणार 24 x 7 लाईव्ह मराठी व हिंदी न्यूज चैनल - डायरेक्टर डॉं. शरीफ बागवान
जळगांव / प्रतिनिधी :- माध्यम क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या देशवाणी प्रायव्हेट लिमिटेड (भारत की आवाज) या नव्या मीडिया समूहाने मराठी व हिंदी माध्यमात धडाकेबाज पाऊल टाकण्याची घोषणा केली आहे. या कंपनीतर्फे 26 जानेवारी 2026 पर्यंत मराठी व हिंदी भाषांतील युट्युब न्यूज चैनल, वेब पोर्टल, मराठी दैनिक आणि ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे डायरेक्टर व मुख्य संपादक डॉं. शरीफ शफी बागवान यांनी दिली आहे.
* नव्या तंत्रज्ञानावर आधारित 24x7 लाईव्ह न्यूज चॅंनेल्स :- देशवाणी प्रायव्हेट लिमिटेडचे उद्दिष्ट आहे की, माहिती, पत्रकारिता आणि मनोरंजन यांचे एकत्रित व्यासपीठ निर्माण करणे. या अंतर्गत कंपनीकडून ओटीटीच्या माध्यमातून 24x7 लाईव्ह मराठी आणि हिंदी न्यूज चैनल सुरू करण्यात येणार आहेत. यासोबतच मराठी दैनिकाचे प्रकाशन आणि देशवाणीचे डिजिटल पोर्टल देखील सुरु होणार आहे. सत्य, निष्पक्षता आणि जबाबदारी या तिन्ही मूल्यांवर आधारित पत्रकारितेचा पाया घालण्यासाठी देशवाणी सज्ज आहे, असे डॉं. शरीफ बागवान यांनी सांगितले.
* नोव्हेंबर 2025 मध्ये तीन नव्या कादंबऱ्या वाचकांसाठी :- देशवाणी प्रायव्हेट लिमिटेड केवळ बातम्यांपुरती मर्यादित नसून साहित्य आणि संस्कृतीच्या प्रसारासाठीही प्रयत्नशील आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये तीन नवीन कादंबऱ्या वाचकांसमोर प्रकाशित केल्या जाणार आहेत. या कादंबऱ्या आधुनिक समाजातील वास्तव, तरुणांचे संघर्ष आणि प्रेरणादायी कथांवर आधारित असतील.
* जानेवारी 2026 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार सोहळा :- देशवाणी प्रायव्हेट लिमिटेड, डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस आणि न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पुरस्कार सोहळा जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात देशभरातील पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.
* देशवाणीचा नेतृत्व वर्ग - युवा आणि दूरदृष्टीसंपन्न टीम :- डायरेक्टर व मुख्य संपादक डॉं. शरीफ शफी बागवान, दुसरे डायरेक्टर फरहान शरीफ बागवान तर सीईओ व संपादक फिरोज पिंजारी ही त्रयी देशवाणी प्रायव्हेट लिमिटेडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विश्वासार्ह मीडिया ब्रँड म्हणून उभे करण्यासाठी कार्यरत आहे.
* ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे मनोरंजन विश्वात नवा अध्याय :- देशवाणी प्रायव्हेट लिमिटेडकडून ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केला जाणार असून या प्लॅटफॉर्मवर मराठी आणि हिंदी वेब सिरीज, चित्रपट, संगीत आणि सामाजिक विषयांवरील माहितीपट प्रेक्षकांसाठी सादर केले जाणार आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी “स्थानीयतेतून जागतिकतेकडे” हा देशवाणीचा मंत्र असेल.
* जोडा देशवाणीच्या क्रांतीशी :- पत्रकारिता फक्त बातमी नाही तर ती जबाबदारी, दृष्टिकोन आणि समाजाशी असलेला संवाद आहे, असे डॉं. बागवान म्हणाले. मराठी व हिंदी युट्युब न्यूज चैनलशी जोडण्यासाठी 92096 55786 / 94222 96786 या क्रमांकावर डायरेक्टर व मुख्य संपादक डॉं. शरीफ शफी बागवान यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Social Plugin