Type Here to Get Search Results !

जयवंत अंबाजी यांची मुरुड-जंजिरा सार्वजनिक वाचनालय अध्यक्षपदी यांची निवड

मुरूड / राजीव नेवासेकर :- मुरुड जंजिरा सार्वजनिक वाचनालय कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेत जयवंत अंबाजी यांची सर्वानुमते निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

    

मुरुड-जंजिरा सार्वजनिक वाचनालय कार्यकारी मंडळाची सभा 13 ऑक्टोबर रोजी 2025 रोजी वाचनालयात खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली. या सभेमध्ये 2025 ते 2028 या वर्षासाठी सार्वजनिक वाचनालय मुरुड जंजिराच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. 


यावेळी मागील तीन वर्षाचा प्रशासनाचा उत्तम अनुभव लक्षात घेता संस्थेच्या विकासासाठी अध्यक्ष म्हणून जयवंत अंबाजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष दिपाली जोशी, सचिव अच्युत चव्हाण, खजिनदार नितीन पाटील, पुस्तक निवड समिती प्रमुख पदी प्रवीण बैकर, सांस्कृतिक समिती प्रमुख पदी सिद्धेश लखमदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच सदस्य म्हणून नैनिता कर्णिक, विनय मथुरे, निवास रसाळ, संजय कासेकर, शैलेश वारेकर यांची नियुक्ती करण्यात आली. विनय मथुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement