Type Here to Get Search Results !

खोपोली प्रभाग क्रमांक 10 मधून सुशांत शिवाजी जाधव निवडणुकीच्या रिंगणात

* स्थानिक समस्या, लोकसंपर्क आणि सेवाभावाच्या बळावर सुशांत जाधवांची उमेदवारी चर्चेत 

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीची सरगर्मी सुरू झाली असून, या प्रभागातून तरुण आणि कार्यकर्तेप्रिय समाजसेवक सुशांत शिवाजी जाधव यांनी अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या ओळखणारे, सर्व स्तरातील जनतेत मिसळणारे आणि सातत्याने सामाजिक कार्य करणारे हे नाव सध्या खोपोलीच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.


* साधेपणातून समाजसेवेचा प्रवास :- लहानपणापासूनच सामाजिक कार्यात रस असलेल्या सुशांत जाधव यांनी आपले बालपण साध्या परिस्थितीत व्यतीत केले. कौटुंबिक जबाबदाऱ्या लहान वयातच स्विकारत त्यांनी शिक्षण बारावीपर्यंत पूर्ण केले आणि नोकरीसोबत लघुउद्योग सुरू ठेवत समाजकार्यात आपले पाऊल कायम ठेवले. गरिब, शेतकरी, विद्यार्थी आणि कामगार वर्गांच्या प्रश्नांसाठी ते नेहमी पुढे सरसावतात. लोकांसाठी काम करण्याची खरी इच्छा असेल, तर पदाची गरज भासत नाही, हा त्यांचा जीवनविचार आहे.


* कुटुंबातून मिळालेली प्रेरणा :-  त्यांचे वडील शिवाजी जाधव हेही एक परिचित समाजसेवक असून, त्यांनी अनेक वर्षे जनतेची नि:स्वार्थ सेवा केली आहे. त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन सुशांत जाधव यांनी समाजकारणात सक्रिय भूमिका घेतली आणि प्रभागातील अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतला.


* स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित :- सुशांत जाधव यांनी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नगर परिषद आणि प्रशासन यांच्याकडे अनेकदा त्यांनी पाठपुरावा करून स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना करण्यात मोलाचे योगदान दिले आहे.


* सामाजिक न्याय आणि विकास हे प्रमुख ध्येय :- निवडणुकीत उतरतानाच सुशांत जाधव यांनी आपला मुख्य अजेंडा स्पष्ट केला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये अजूनही अनेक मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. स्वच्छ रस्ते, चांगला पाणीपुरवठा, युवकांना रोजगार, महिलांची सुरक्षितता आणि वृद्धांसाठी आरोग्य सुविधा या सर्व गोष्टींसाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांचा आशिर्वाद मिळाला, तर प्रभाग आदर्श बनविण्याचा निर्धार आहे.


* आगामी निवडणुकीत वाढणार चुरस :- खोपोली नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. सुशांत जाधव यांची उमेदवारी स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे आणि तरुण नेतृत्वाचा उदय दर्शवत आहे. लवकरच ते आपला प्रचार आराखडा आणि विकास दृष्टिकोन जनतेसमोर मांडणार आहेत. जनतेकडून मिळणारा उत्साह आणि प्रतिसाद पाहता, त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आणि आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement