Type Here to Get Search Results !

आरोग्यदूत गणेश देशमुख पंचायत समितीसाठी पहिली पसंती



* शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी; मुख्यमंत्री सहायता निधी व विविध योजनांतून शेकडो नागरिकांना मदत

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर पाचोरा तालुक्यातील राजकारणाला चांगलाच रंग चढला आहे. नगरदेवळा पंचायत समिती गणात शिंदेसेनेकडून इच्छुकांची लांबलचक रांग असली तरी, एक नाव सर्वांच्या चर्चेत आहे - आरोग्यदूत गणेश देशमुख...सामाजिक कार्य, जनसेवा, आरोग्यसेवा आणि विकासाच्या राजकारणातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे देशमुख हे आज जनतेच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार ठरत आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेत भडगाव - पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देशमुखांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. देशमुख हे खरे अर्थाने जनसेवक आहेत, त्यांना संधी मिळाल्यास जनता नक्कीच त्यांना विजय मिळवून देईल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.


* 'आरोग्यदूत’ गणेश देशमुख - सेवाभावी कार्याची परंपरा :- गेल्या काही वर्षांत गणेश देशमुख यांनी केलेले कार्य हे त्यांच्या “आरोग्यदूत” या नावाला साजेसे ठरत आहे. त्यांनी शेकडो नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी, तसेच स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून आर्थिक मदत मिळवून दिली आहे. रुग्ण, अपघातग्रस्त, गरीब आणि निराधार कुटुंबांना ते स्वतःच्या घरातील माणूस समजून मदतीचा हात देतात. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर किंवा जळगाव येथे वैद्यकीय मदत लागली तरी गणेश देशमुख स्वतः उपस्थित राहून मदत करतात. त्यांच्या या कार्यामुळे ते फक्त समाजसेवक नव्हे, तर लोकांच्या विश्वासाचा आधार बनले आहेत.


* कामातून सिद्ध झालेले नेतृत्व :- देशमुख यांनी मागील काही काळात मुख्यमंत्री सहायता निधी व स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत शेकडो नागरिकांना मदत, MSBEB (वीज वितरण कंपनी) कडून शेतकऱ्यांची थकबाकी माफी व नव्या कनेक्शनची सोय, बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना त्वरित मदत, कोरोना काळात शेकडो गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य व औषध पुरवठा...शाळा, मंदिरे व ग्रामपंचायतींसाठी स्वच्छता व आरोग्य शिबिरांचे आयोजन, ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास उपक्रम...अनाथ, विधवा व दिव्यांगांसाठी विविध शासकीय योजनांतून सहाय्य उपलब्ध, गावात पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर ठोस उपाय - नवीन टाक्या व विहिरींची दुरुस्ती, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाशी समन्वय साधत खत, बियाणे व सिंचनसुविधा उपलब्ध करून देणे, महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची दिशा देणे आदी कामे करून दिली आहेत. या सर्व कामांच्या माध्यमातून त्यांनी "राजकारण हे जनसेवेसाठीच असते" हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.


* बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा :- गणेश देशमुख हे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे अनुयायी आहेत. त्यांच्या कामकाजात 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वाची झलक स्पष्ट दिसते. ते जातीपातीच्या भिंती ओलांडून विकासाच्या राजकारणाचा पुरस्कार करतात. आदिवासी समाज, असंघटित कामगार, बेरोजगार तरुण यांच्यासाठी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत.


* वाचन संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपणारा नेता :- गणेश देशमुख यांनी ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रसार केला आहे. एका संपूर्ण पिढीला साक्षर आणि जागरूक करण्याचा त्यांचा प्रयत्न आजही सुरू आहे. त्यांनी अग्नावंती धरणातील गाळ काढण्यासाठी मदत केली, नदी सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतला आणि गावात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी नेहमी सक्रिय राहतात.


* “आरोग्यदूत” या नावाला साजेसे कार्य :- आरोग्य क्षेत्रातील योगदानामुळे गणेश देशमुख यांना “आरोग्यदूत” म्हणून संबोधले जाते. त्यांच्या पुढाकाराने अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी आणि मोफत वैद्यकीय उपचार शिबिरे घेण्यात आली आहेत. गावोगावी फिरून त्यांनी आरोग्य जागरूकतेचा प्रसार केला आणि “निरोगी समाज” हा ध्यास जपला.


गणेश देशमुख हे खरे जनसेवक आहेत. त्यांनी समाजकार्य, आरोग्यसेवा आणि शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवला आहे. पंचायत समितीवर असे सेवाभावी नेतृत्व आवश्यक आहे, म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.  


* जनतेचा प्रचंड प्रतिसाद :- नगरदेवळा पंचायत समिती गणात जवळपास 7 इच्छुकांनी तिकीटाची मागणी केली आहे. मात्र, लोकांच्या मनात “गणेश देशमुखच हवेत” अशी भावना निर्माण झाली आहे. स्थानिक युवक, महिला बचतगट आणि शेतकरी वर्ग देशमुखांच्या समर्थनार्थ एकवटत आहेत. देशमुख हे आमच्यातलेच आहेत. त्यांनी आमच्यासाठी काम केले आहे, असे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.


* देशमुख यांचा विकास आराखडा :- गणेश देशमुख यांनी सांगितले की, आरोग्य, शिक्षण, शेती आणि पायाभूत सुविधा या चार स्तंभांवर गावांचा सर्वांगीण विकास घडवू. सामान्य माणसाला सन्मानाने जगता यावे, हीच माझी खरी जिद्द आहे. त्यांच्या नेतृत्वात पंचायत समितीचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.


गणेश देशमुख हे फक्त उमेदवार नाहीत, तर जनतेच्या मनातील विश्वासाचे प्रतीक ठरले आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणाने, सेवाभावी कार्यशैलीने आणि जमिनीवरच्या राजकारणामुळे ते पंचायत समितीसाठी “जनतेची पहिली पसंती” ठरत आहेत. राजकारणात नव्या पिढीचा विचार, प्रामाणिक दृष्टिकोन आणि जनसेवेचे बळ असलेले हे नेतृत्व गावोगाव नव्या आशेचा किरण बनले आहेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement