* पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
* प्रेरणादायी वातावरणात क्रीडास्पर्धांचा जल्लोष
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन झोन 3 खो-खो स्पर्धेचा पहिला दिवस उत्साहात व शिस्तबद्धरीत्या पार पडला. ही दोन दिवसीय स्पर्धा 11 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि उत्कृष्ट आयोजनामुळे संपूर्ण वातावरण क्रीडामय झाले होते.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कपिल पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूट उपाध्यक्ष प्रकाश हिराचंद मुथा तसेच ठाणे विभाग सचिव राहुल आकूल सर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शिंगारपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. विलास जे. पिलेवान, खो-खो निवड समितीचे सदस्य शिवराज दैनुर्काठार, अध्यक्षा रोहिणी दोम्बे आणि सदस्या वेदांगी यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याशिवाय, राष्ट्रीय व रेल्वे खो-खो खेळाडू अमित परब व महेश शिंदे, मुख्य पंच समर्थ कोहली, आणि वरिष्ठ पत्रकार नरेश जाधव यांच्या उपस्थितीने स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉं. विलास जे. पिलेवान सरांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यानंतर राहुल आकूल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रा. शब्बीर कर्जतवाला आणि प्रा. दुर्रझ तिवळे (क्रीडा प्रमुख व कार्यक्रम समन्वयक) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. अन्न समिती, प्रवास समिती (कर्जत स्टेशन ते महाविद्यालय), विभाग प्रमुख, अध्यापक वर्ग, अप्रशिक्षक कर्मचारी व ग्रंथपाल यांचे सक्रिय सहकार्य लाभले. विद्यार्थी स्वयंसेवकांनी पहिल्या दिवशी अपार मेहनत घेत स्पर्धा अत्यंत अनुशासित व यशस्वीरीत्या पार पाडली. प्रदीपचंद्र शिंगारपुरे सरांनी आभार मानले.
* दुसऱ्या दिवसाची उत्सुकता :- स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरी आणि अंतिम सामने होणार असून विजेत्या संघांना पारितोषिक वितरण सोहळ्यात गौरविण्यात येईल विद्यार्थ्यांमध्ये पुढील दिवसासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.


Post a Comment
0 Comments