* दीर्घ आजाराने वयाच्या 82 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व पांडुरंग गरबड पाटील (वय 82) यांचे आज शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
स्वभावाने मनमिळावू व गावात आदराचे स्थान असलेल्या पांडुरंग पाटील यांनी आयुष्यभर समाजातील सर्व घटकांना आपुलकीने जपले. गावाच्या सामाजिक बांधिलकीत त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग राहिला होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार मागे आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज 1 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता नगरदेवळा-आखतवाडे रोडवरील राहत्या घरातून निघणार आहे. संजय पांडुरंग पाटील, राजेंद्र पांडुरंग पाटील तसेच पाटील समाज व ग्रामस्थ नगरदेवळा (ता. पाचोरा) शोकाकुल आहेत.


Social Plugin