Type Here to Get Search Results !

जलसंपदा विभागाचे अभियंता राजेंद्र वायफळकर यांचा सन्मान

* भूमी किसान जनता पार्टीच्या सांस्कृतिक मोर्चातर्फे सत्कार

* शाल, पुष्पगुच्छ व संविधान पुस्तक प्रदान करून सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा

नाशिक / फिरोज पिंजारी :- भूमी किसान जनता पार्टी सांस्कृतिक मोर्चातर्फे जलसंपदा विभागातील वरिष्ठ अभियंता राजेंद्र वायफळकर यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भारताचे संविधान पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. दीर्घ व यशस्वी सेवेनंतर निवृत्त होत असलेल्या वायफळकर यांना पुढील आयुष्य निरोगी, सुखी आणि समृद्ध जावो, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.


वायफळकर यांनी अनेक वर्षे जलसंपदा विभागात कार्य करताना लोकहिताचे अनेक प्रकल्प यशस्वीरित्या राबविले. त्यांच्या कार्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीबद्दल उपस्थितांनी आदर व्यक्त केला.


सत्कार सोहळा साधेपणाने आणि स्नेहभावाने पार पडला. यावेळी मान्यवरांनी वायफळकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करीत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. भूमी किसान जनता पार्टी सांस्कृतिक मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष, विक्रम गायकवाड, राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदाताई पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिपक निकम, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर, अण्णा हिगमिरे आदी यावेळी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement