* नेरी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
* आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवशी शक्तीप्रदर्शन
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोरा–भडगाव विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाच्या ताकदीत मोठी वाढ झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेरी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकत अधिकृतरित्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेशात प्रामुख्याने धर्मराज पाटील, आनंद पाटील, सुनील पाटील, रावण रामराव पाटील, पंकज पाटील, दिनेश बोरसे, गणेश किशोर पाटील, लतीफ अब्बास पठाण, काशिनाथ धोंडू अहिरे, श्रीराम नारायण गढरी, नितेश देविदास पाटील, देविदास संतोष पाटील, विजू संतोष अहिरे, मोहम्मद पठाण, अशोक अहिरे, आनंद अहिरे, सिद्धार्थ अहिरे, निंबा शंकर कुंभार यांच्यासह अनेक वरिष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. नव्या कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवित निर्णय घेतल्याचे सांगितले.
* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व :- आगामी नगरदेवळा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. खास करून नगरदेवळा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना - भाजप व महायुतीच्या बालेकिल्ला असलेल्या गटांत प्रतिष्ठेची लढत होण्याची चिन्हे आहेत. या नव्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाचे प्रभावक्षेत्र आणखी बळकट झाल्याचे स्थानिक पातळीवर दिसत आहे.
* आ. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाला बळ :- नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हा प्रमुख रावसाहेब (जिभू) पाटील, शितल सोमवंशी यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले असून गावागावात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
* जनता व कार्यकर्त्यांचा प्रतिसाद :- या प्रवेशामुळे नेरी परिसरात तसेच आसपासच्या ग्रामीण भागात शिवसेना शिंदे गटाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे जाणवले. स्थानिक स्तरावर यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीत होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा - भडगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होत असून, यंदाच्या निवडणुकांमध्ये हा घटक निर्णायक ठरणार आहे.


Social Plugin