Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यातील बालाजी रथयात्रा उत्सवाला आमदार मंगेश चव्हाण यांची सदिच्छा भेट

* शिवकन्या बहुद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला उत्सवात सहभाग

* आमदार मंगेश चव्हाण व पोलिस प्रशासनाचा संस्थेकडून सत्कार 

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे पारंपरिक श्रद्धा, भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा करण्यात आलेल्या बालाजी रथयात्रा उत्सवाला चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष सदिच्छा भेट दिली, याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी देखील होत्या. शिवकन्या बहुद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांचा सत्कार केला तसेच पोलिस प्रशासनाने योग्य तो बंदोबस्त ठेवला, यासाठी त्यांचाही सन्मान करण्यात आला.


या प्रसंगी आमदार चव्हाण यांनी बालाजी महाराजांचे दर्शन घेऊन गावातील मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सर्वांना रथोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी गावातील सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि उत्साहाचे कौतुक केले.


या भव्य रथयात्रेत शिवकन्या बहुद्देशीय संस्था, नगरदेवळा यांच्यावतीने सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी मुकेश राजपूत, लक्ष्मण पाटील, महेश पाटील, उदय मांडोळे, यश महाजन, गणेश गवळे यांसह “88 बाबा कंपनी” या समूहाने देखील पोलिस प्रशासनाचे कौतुक करीत आभार मानले व आमदार चव्हाण यांचा सत्कार केला.


याप्रसंगी आमदार चव्हाण म्हणाले की, नगरदेवळा गावाने परंपरा आणि भक्तीची जोपासना उत्कृष्टरीत्या केली आहे. अशा धार्मिक उत्सवांमुळे समाजात ऐक्य आणि सद्भावना वाढते.


नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी आमदारांच्या भेटीचे स्वागत करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला. बालाजी महाराजांच्या कृपेने हा उत्सव गावाच्या अभिमानाचा ठरला आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement