Type Here to Get Search Results !

पोलिस पाटील संघटनेकडून मदतीचा हात

* कै. किरण तावडे यांच्या कुटुंबाला ५२ हजार ७५० रुपयांची आर्थिक मदत

* भविष्यात सर्व पोलिस पाटीलसाठी विमा योजना लागू करण्याचा संकल्प

पाचोरा / प्रतिनिधी :- नांद्रा येथील पोलिस पाटील कै. किरण वसंत तावडे (वय ४६) यांच्या अकस्मात निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील पत्नी व दोन लहान मुले सध्या शिक्षण घेत असून, घरातील प्रमुख व्यक्तीच्या जाण्याने आर्थिक व मानसिक संकट निर्माण झाले आहे.


या दु:खद प्रसंगी पाचोरा पोलिस पाटील संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. संघटनेतर्फे ५२ हजार ७५० रुपयांची आर्थिक मदत कै. किरण तावडे यांच्या परिवाराला देण्यात आली.


यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी जिल्हा अध्यक्ष दिपक चौधरी, तालुका अध्यक्ष भगवान पवार तसेच अनेक गावांतील पोलिस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी दिवंगत किरण तावडे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबास धैर्य देत सहवेदना व्यक्त केल्या.


याप्रसंगी पंजाबराव पाटील (लासगाव), किरण पाटील (आसनखेडा), भुषण सोळुंके (बांबरूड), चेतन पाटील (घुसरडी), श्रीकांत पाटील (भोरटेक), योगेश पाटील (वेरूळी), विनोद पाटील (संगमेश्वर), विजय ठाकरे (परधाडे), राहुल खैरनार (भातखंडे), मुकेश अहीरे (खाजोळा), राजु पाटील (माहेजी), राहुल देशमुख (सारोळा), प्रताप ठाकरे (चिंचखेडा), विनोद सयाजी पाटील (गाळण), समाधान पाटील (वडगाव), तुकाराम तेली (खडकदेवळा) आदी पोलिस पाटील उपस्थित होते.


संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तालुक्यातील सर्व पोलिस पाटील हे गावाच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्रं कार्यरत असतात. त्यांच्या संकटसमयी संघटनेने एकत्र येऊन सामाजिक ऋण फेडले आहे. संघटनेने भविष्यात प्रत्येक पोलिस पाटीलसाठी विमा योजना लागू करण्याचा संकल्प केला असून या संदर्भात शासन दरबारी चर्चा करण्यात येणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली.


याप्रसंगी वक्त्यांनी म्हटले की, पोलिस पाटील हे गावचे तळागाळातील सुरक्षा दूत आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी व आर्थिक स्थैर्यासाठी संघटनेमार्फत विमा संरक्षण योजना राबविण्यात येईल. शासनानेही या दिशेने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement