Type Here to Get Search Results !

आमदार महेश बालदी यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर

* दुर्गम भागातील नागरिकांना मोफत उपचार - 83 जणांची तपासणी, 12 जणांना शस्त्रक्रियेची संधी

खालापूर / अर्जुन कदम :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आमदार महेश बालदी यांच्या वतीने आणि डॉं. हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्या सौजन्याने नानिवली (चौक परिसर) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच पूजा जगदीश हातमोडे, सदस्य सुभाष पवार, नैना झिंगे, डॉं. मृण्मयी वैद्य, अनुष्का मालवनकर, शिबिर संयोजक विनोद पाचघरे, सीमा बेलोसर व सहकारी, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, पनवेल आदी उपस्थित होते.

* दुर्गम भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम :- ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी दुर्गम नानिवली गावातील नागरिकांसाठी हे शिबिर आयोजित केले. शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना मोतीबिंदू व इतर नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी ने-आण, राहण्याची व्यवस्था, भोजन सुविधा, शस्त्रक्रिया खर्च हे सर्व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेश बालदी यांच्या वतीने मोफत करण्यात येणार आहेत.

* रुग्णांना झालेला प्रत्यक्ष लाभ :-

- एकूण नेत्र तपासणी : 83 रुग्ण

- शस्त्रक्रियेसाठी निवड : 12 रुग्ण

आवश्यकतेनुसार मोफत चष्मे वाटप

या शिबिरामुळे गावातील ज्येष्ठ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

* स्थानिक प्रशासनाचे सहकार्य :- शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नानिवली ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

हा उपक्रम ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement