* बहुजन युथ पँथरकडून उमेदवारी जाहीर : नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार
* विविध पक्षांचे उमेदवार तयार असताना समाजाभिमुख चेहरा म्हणून साळुंके यांची एन्ट्री चर्चेत
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका 2 डिसेंबरला होणार असून या निवडणुकीत नगराध्यक्षाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान पत्रकार किशोर साळुंके यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपली दमदार उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगवली आहे.
* राजकीय पक्षांची हालचाल :- खोपोली नगर परिषदेत एकूण 15 प्रभागांतून नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्याचबरोबर शहराचा पहिला नागरिक ठरणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे विचारात घेतली आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांजकडुन दत्तात्रय मसुरकर, मंगेश दळवी, सुनिल पाटील यांची नावे पुढे असून शिवसेना (शिंदे गट) यांजकडुन कुलदिप शेंडे यांचे नाव जाहीर झाले आहे. यामुळे मित्र पक्ष असलेले भारतीय जनता पक्षाकडुन स्वबळाचा नारा देण्याची शक्यता असून भाजपा कडून यशवंत साबळे हे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये एक नवा, प्रभावी आणि लोकाभिमुख चेहरा समोर आला आहे, तो म्हणजे पत्रकार किशोर साळुंके.
* बहुजन युथ पँथरची घोषणा - आपला उमेदवार साळुंके :- खोपोलीतील गेल्या काही काळातील राजकीय अस्थिरता, एकमेकांतील संघर्ष आणि विकासकामांतील अडथळे यांचा विचार करून बहुजन युथ पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी खोपोली शहर अध्यक्ष व व्हॉईस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष पत्रकार किशोर साळुंके यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले.
* किशोर साळुंके - जनतेतला चेहरा, तरुणाईत प्रचंड लोकप्रिय :- पत्रकार किशोर साळुंके हे खोपोली शहरात अत्यंत ओळखले जाणारे आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारे व्यक्तिमत्त्व आहे. युवा वर्ग, खेळाडू, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर लढाऊ भूमिका...बेकायदेशीर कामांवर आवाज उठविताना झालेल्या संघर्षात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल, प्रशासनाशी थेट संवाद साधून अनेक कामे मार्गी लावण्याचा अनुभव...त्यांच्या या लोकाभिमुख कामामुळे त्यांना शहरातील मोठा पाठिंबा मिळत असल्याचे राजकीय निरीक्षकाचे म्हणणे आहे.
* खोपोलीतील राजकारणात मोठा बदल ? :- पत्रकार साळुंके यांच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एन्ट्रीमुळे खोपोली नगर परिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. पारंपरिक पक्षांपुढे नवी स्पर्धा निर्माण झाली आहे. तरुण व नवीन नेतृत्वाला मिळणारी संधी, मतदारांमध्ये उत्सुकता आणि चर्चा, बहुजन युथ पँथरचा शहरातील वाढता प्रभाव यामुळे संपूर्ण खोपोलीतील राजकारणात मोठा फेरबदल अनिवार्य आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


Post a Comment
0 Comments