Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नगरदेवळा येथील युवा उद्योजक मुन्ना भांडारकर यांचा सत्कार

* भाजप उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय संपर्क मंत्री शुभम शिंपी यांचा ही गौरव 

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, नगरदेवळा पत्रकार संघ व नगरदेवळा शिंपी समाजाच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगरदेवळा येथील युवा उद्योजक प्रणय (मुन्ना) दिलीप भांडारकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या ‘उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार’ देवून गौरव करण्यात आला.


तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिवनारायण देवराम जाधव (शिवा बाप्पू) यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय भाजप उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय संपर्क मंत्री पदी नुकतीच निवड झाल्याबद्दल नगरदेवळा गावाचे सुपुत्र शुभम शिंपी यांचा ही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


या गौरव सोहळ्यास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष राकेश सुतार, शिंपी समाजाचे जेष्ठ सल्लागार दिलीप भांडारकर, शिंपी समाज अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, शिंपी समाज रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र इसाई, शेतकरी संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष संजय महाजन (भोरटेक), शिंपी समाज अलिबाग तालुका अध्यक्ष विजय जगताप, विनय जगताप, पत्रकार शैलेंद्र बिरारी, सुनील शिंपी, संजय सोनार, जितेंद्र परदेशी, फारुख शेख, रावसाहेब राउळ, फिरोज पिंजारी, विश्वनाथ आप्पा (फोटोग्राफर) यांच्यासह शाम सर इसाई, केदार बोरसे, गोविंद बोरसे, मनोज शिंपी, रविंद्र बोरसे, तुषार बोरसे, अशोक शिंपी आदी उपस्थित होते.


या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील योगदानाचा गौरव करून उपस्थित मान्यवरांनी समाजातील सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा दिली. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारप्राप्तांचा उत्साह वाढवत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement