* पतीला मारण्याचा रचला कट, पण नशेत गढलेल्या प्रियकरामुळे वाचले प्राण
* दूधात नशेचे औषध, हातपाय बांधून हत्या करण्याचा प्रयत्न
* डॉंक्टरची थरारक सुटका, पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू
बरेली / प्रतिनिधी :- बरेली शहरातील सुभाषनगर भागात घडलेली एक घटना सध्या संपूर्ण उत्तर प्रदेशभर चर्चेचा विषय ठरली आहे. 57 वर्षीय नेत्ररोग तज्ज्ञ डॉंक्टर विशालचंद्र सक्सेना यांच्या पत्नीने आपल्या 47 वर्षीय प्रेमी इलेक्ट्रिशियन सौरभ सक्सेना सोबत मिळून स्वतःच्या पतीचा खून करण्याची भीषण योजना आखली होती. परंतु नियतीने डॉंक्टरचे प्राण वाचवले, आणि आज ही कहाणी संपूर्ण शहराला हादरवून सोडत आहे.
* चार वर्षांचे अवैध नाते आणि खुनाचा कट :- डॉं. विशालचंद्र सक्सेना हे सेवानिवृत्त नेत्ररोग तज्ज्ञ असून सुभाषनगरमधील एका आलिशान बंगल्यात पत्नी शिखा सक्सेना सोबत राहत होते. काही काळापासून त्यांना शंका येऊ लागली की त्यांच्या पत्नीचे कोणासोबत तरी संबंध आहेत. चौकशीअंती त्यांनी हे शोधून काढले की, पत्नी शिखा हिचे इलेक्ट्रिशियन सौरभ सक्सेना सोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू आहेत. हे नाते गुप्त राहिले नाही, आणि डॉंक्टरांनी याविषयी आक्षेप घेतल्यावर शिखाने प्रेमीसोबत डॉंक्टरचा कायमचा बंदोबस्त करण्याचा कट रचला.
* दूधात नशेचे औषध, सीसीटीव्ही बंद आणि हत्येची तयारी :- 28 ऑक्टोबरच्या रात्री सर्व काही नियोजनानुसार झाले. शिखाने डॉंक्टर विशाल यांना दूधाचा ग्लास दिला, पण त्या दूधात नशेची गोळी मिसळलेली होती. काही वेळातच डॉंक्टर बेशुद्ध पडले. त्यानंतर शिखा आणि सौरभ यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून घेतले आणि डॉक्टरचे हातपाय बांधले. हत्या करण्याची तयारी सुरू होती, गळ्यात फास घालण्याचा प्रयत्नही झाला.
* नशेत गढलेला प्रियकर आणि पळून गेलेले डॉंक्टर :- पण याच क्षणी परिस्थिती उलटी झाली. शिखाने प्रियकर सौरभला दारू दिली, तो इतका नशेत गढला की खुर्चीवरच कोसळला. शिखा बाथरूममध्ये गेल्याचा फायदा घेत डॉंक्टरांना थोडा शुद्ध आली. त्यांनी जीवाच्या आकांताने स्वतःचे हातपाय सोडवले आणि घरातून पळून बाहेर आले. पडोसींच्या सीसीटीव्हीत डॉंक्टर मदतीसाठी पळत असल्याचे दृश्य दिसले आणि तोच व्हिडिओ पोलिसांसाठी मुख्य पुरावा ठरला.
* पोलिसांचा तपास - घरातून सापडले पुरावे :- डॉं. विशाल यांच्या तक्रारीनंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. घरातून रस्सी, टेप आणि चाकू असे साहित्य जप्त करण्यात आले, जे हत्या करण्यासाठी वापरले जाणार होते. तपासादरम्यान स्पष्ट झाले की सर्व कॅमेरे प्रेमीने पूर्वीच बंद केले होते. सध्या पत्नी शिखा आणि तिचा प्रियकर सौरभ हे फरार आहेत. पोलिसांच्या अनेक टीम्स त्यांचा शोध घेत आहेत.
एसपी सिटी मानुष पारीक यांनी सांगितले, आम्ही तपास सुरू केला आहे. काही ठोस पुरावे मिळाले आहेत. आरोपी सापडल्यावर संपूर्ण कटाची माहिती समोर येईल.
डॉं. विशाल म्हणाले की, त्या रात्री माझ्या पत्नीने मला दूधात नशेचं औषध देऊन बेशुद्ध केले. मला होश आल्यावर माझे हातपाय बांधलेले होते आणि माझ्या गळ्याभोवती दोर होता. पण सौरभ दारूमुळे बेशुद्ध पडला आणि मला पळून जाण्याची संधी मिळाली. माझ्या जीवावर बेतलेले हे षड्यंत्र मी कधीच विसरू शकत नाही.
या घटनेनंतर बरेली शहरात सनसनाटी वातावरण निर्माण झाले आहे. एक शिक्षित, प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्री आणि तिचा प्रेमी यांनी अशा थरारक कटाचा भाग बनल्याने लोकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. प्रेम, फसवणूक आणि पैशाच्या मोहाचे विष या कहाणीने बरेली शहर हादरले आहे.


Post a Comment
0 Comments