* शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे ‘शाह इंटरप्राईजेस’ या नव्या होलसेल दुकानाचे भव्य उद्घाटन रविवार, 2 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. प्रो. प्रा. सद्दाम शाह यांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक तथा त्यांचे वडील बशीर शाह रमजान शाह फकीर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहर गिरधर पाटील ऊर्फ रावसाहेब जिभू यांनी भूषविले.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये प्राचार्य किरण काटकर सर, साप्ताहीक वृत्त प्रभात संपादक फारुख शाह नौमानी, हाजी अब्दुल गणी सेठ, वसंत जिभू, फारुख पटेल, माजी सरपंच कृष्णा सोनार, नूर मेंबर, अन्नु मेंबर, पिंटू भामरे, अशोक चौधरी, रोशन जाधव सर, जावेद शेख सर, कडू आबा, भैया महाजन, सादिक बागवान, छोटू लोहार, सचिन देशमुख, गोकुळ मास्तर, हैदर शाह, सोनू नाना, बाप्पू फकीरा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील महाजन, वसीम शेख, धनराज चौधरी, पत्रकार प्रकाश जगताप, मिलिंद दुसाने, शैलेंद्र बिरारी, सुनील शिंपी, फिरोज पिंजारी, फारुख शेख, रावसाहेब राउळ, सौरव तोष्णीवाल, संजय सोनार, अली रजा खान, जितेंद्र परदेशी, जळगाव जिल्हा प्रतिनिधी सैय्यद कुतबुद्दीन, जळगाव प्रतिनिधी आसिफ शाह, फैजपूर प्रतिनिधी कैफ खान, भडगाव तालुका प्रतिनिधी अमीन शाह, मेडिकल असोसिएशनचे डॉं. युवराज गढरी, डॉं. अभय पाटील, डॉं. अभय राजपूत, डॉं. दर्शन पवार, डॉं. जयपालसिंह पवार, डॉं. योगेश परिहार, डॉं. योगेश पाटील, डॉं. धीरज मानकर, व्यापारी असोसिएशनचे योगेश शिरुडे, अनिल शिरुडे, अण्णा महाजन, नाना महाजन, मुन्ना शिरुडे, अमोल शिरुडे, अरशद रजा, मासूम पिंजारी, हसन शाह, मोसिन बेग, खालीक सेठ, उमर रजा टेलर, खलील सेठ, याकूब शाह, शेर शाह, अफजल खान, शेर खान सेठ, असगर शाह, लियाकत शाह, मोहसिन शाह, करीम शाह, अशोक सोन्नी, संतोष परदेशी आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी सद्दाम शाह यांच्या व्यावसायिक धाडसाचे कौतुक करीत तरुणांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडेही वाटचाल करावी, रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन द्यावे, असे विचार मांडले. बशीर शाह यांच्या कष्ट, मार्गदर्शन व शिक्षणाच्या मूल्यांची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. चाळीसगाव, मनमाड, येवला, कोपरगाव व कळवण येथील टीव्हीएस शोरूम तसेच चाळीसगाव येथील रॉंयल एनफिल्ड शोरूमचे संचालक वीरेंद्र अशोक भांडारकर यांनी विशेष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुबारक शाह यांनी केले तर आभार जावेद शाह यांनी मानले. उद्घाटन सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक, व्यावसायिक व युवकांची उपस्थिती होती. यावेळी जावेद बशीर शाह यांची वृत्त प्रभातच्या नगरदेवळा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.


Social Plugin